मुंबई : मागील जवळपास चार दशकं म्हणजेच चाळीस वर्षांपासून जगभरातील शास्त्रज्ञ एच.आय.व्ही. (HIV) च्या व्हायरस वर लस शोधण्याचा प्रयत्न करतायेत. त्यानंतर आलेल्या अनेक आजारांवर लस शोधून अनेक रोग बरे देखील करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. पण एच.आय.व्ही व्हायरसवर अजूनपर्यंत तोडगा काढणे शक्य झाले नाही. दरम्यान या चाळीस वर्षाच्या प्रवासात आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे.
Duke Human Vaccine Institute (DHVI) या इन्स्टिटयूटच्या माध्यमातून झालेल्या प्रयोगांमधून लवकरच एच.आय.व्ही वरील लस निर्माण होण्याचे आशादायी चित्र तयार झाले आहे. आतापर्यंतचे प्रयोग एच.आय.व्ही च्या व्हायरसला का लागू पडले नाही? त्याचे वेगळेपण काय? सध्या होणारे संशोधन नेमके काय काम करते आहे? याचा कोणत्या प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाला? आणि भविष्यात काय होऊ शकते याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.