मुंबई : सोमवारी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात धूलिकणांचे वादळ आलेले पाहायला मिळाले, यामुळे मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून १४ लोक मृत्युमुखी पडले तर ७४ जण जखमी झाले आहेत. याशिवाय १८७ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षात आफ्रिका आणि आशियामधील देशांमध्ये सातत्याने या धूलिकणांचे वादळ का येते आहे? ही नैसर्गिक आपत्ती आहे की हे मानवी हस्तक्षेपामुळे होते आहे. धूलिकणांच्या या वादळामुळे अनेकांना फुफ्फुसाचे आजार, श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या समस्या, ऍलर्जी सारखे त्रास का होऊ लागलेत? शास्त्रज्ञांनी कोणती भीती व्यक्त केली आहे जाणून घेऊया.