तुमच्या आयुष्यात आर्थिक वादळ आल्यास तुमच्या मेंदूत नेमके काय बदल होतात?

अतिआनंद किंवा अतिदुःख कधी होते?
neurological changes
neurological changesesakal
Updated on

पुणे - जर तुम्हाला अचानक खूप मोठ्या पैशांची लॉटरी लागली किंवा तुम्ही शेअर्समध्ये पैसे जिंकलात किंवा हारलात, किंवा तुम्ही अपेक्षा केली त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिकची नोकरी तुम्हाला मिळाली किंवा अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी कमी पगार मिळाला तर या अचानक येणाऱ्या आर्थिक वादळाने तुमच्या मेंदूत नेमके काय बदल होतात?

तुम्ही एकदम आनंदीत होता किंवा एकदम दुःखी होता तेव्हा हा आनंद किंवा दुःख खूप काळ टिकणारे असते का?

मेंदूविकार तज्ज्ञांच्या मते ही एक 'हायडोनिक ट्रेडमिल' स्थिती असते. अचानक झालेल्या या बदल आणि त्यांनतर पुन्हा त्याच स्थितीत येणाऱ्या स्थितीला इंग्रजीत 'हायडोनिक ट्रेडमिल' ही संकल्पना वापरली जाते.

यामुळे तुमच्या मनातील भावना काही काळ अंत्यंत सकारात्मक किंवा नकारात्मक पातळीवर जातात आणि पुन्हा आहे त्या स्थितीत येतात. ही प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक असली तरीही यातून बाहेर पाडण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.

याबाबत पुण्यात प्रॅक्टिस करणारे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ.निलेश पळसदेवकर म्हणाले, जेव्हा आपल्याला खूप आनंद किंवा खूप दुःख होतं त्यावेळी 'सेरोटोनिन' आणि 'डोपामिन' हे दोन ' न्यूरोट्रान्समीटर' मेंदूत हे बदल करतात. पण हा आनंद किंवा दुःख तात्कालिक असते.

या दरम्यान तुमचा मेंदू साधारण 'DBADA' या पाच वेगवेगळ्या अवस्थेतून जातो

१) Denial (नाकारणे ) - एखादी गोष्ट अचानक झाल्याने ती लगेच स्वीकारणे आपल्याला शक्य होत नाही. मेंदू या बदलाचा स्वीकार तितक्या पटकन करत नाही आपण ती गोष्ट पुन्हा पुन्हा तपासून पाहतो. नकारात्मक स्थितीत माझ्या हातून हे वाईट कृत्य झालेच नाही असा पवित्रा व्यक्तीकडून घेतला जातो.

२) Bargaining (हो नाही हो नाही करणे) - या संकल्पनेत संबंधित व्यक्ती स्वतःशीच एखादी गोष्ट स्वीकारायला तयार नसते. म्हणजे मला इतक्या मोठ्या पगाराची नोकरी कशी लागेल, असा प्रश्न ती स्वतःलाच विचारत राहते. तर नकारात्मक स्थितीत ती व्यक्ती स्वतःशीच बोलते की, मी केलेला गुन्हा हा एवढा मोठा नाहीये. किंवा मी जे पैसे शेअर्स मध्ये हरलोय ती एवढी मोठी रक्कम नाहीये.

३) Anger (राग) - या स्थितीत राग येणे या स्थितीतही व्यक्ती जातो. सकारात्मक गोष्टींत राग सामाजिक अपेक्षा किंवा स्वतःबद्दलच्याच आत्मविश्वासाबाबत शंका निर्माण होऊन निर्माण होतो. लॉटरीच्या अनुषंगाने पाहायचे झाले तर लोकांच्या आपल्यापकडून असणाऱ्या अपेक्षा हा मुद्दा असतो. तर नकारात्मक स्थितीत मी असं का वागलो हा विचार करून स्वतःचाच स्वतःला राग येतो.

४) Depression (नैराश्य) - सकारात्मक स्थितीत अनेकदा जबाबदारीचं ओझं निर्माण होऊन निराश होण्याची स्थिती येते. म्हणजे अचानक मिळालेला पैसा आता कसा आणि कुठे गुंतवायचा? तर नोकरीच्या बाबतीत इतक्या मोठया पगाराच्या नोकरीत येणारं जबाबदारीचं ओझं वाटू लागते. असे का झाले किंवा का केले यावरून नैराश्य येण्याची शक्यता असते.

५) Acceptance (स्वीकारणे) : वेगवेगळ्या अवस्थेतून तुमच्या मेंदूची स्थिती जाऊन आली की ती पुन्हा मूळ पदावर येते. जे घडले आहे ते स्वीकारायला लागते. अखेर व्यक्ती हे मान्य करते की मला लॉटरी लागली आहे आणि त्यातून आपल्याला संबंधित गोष्टी करायच्या आहेत. तसेच आपण आपल्या काही चुका झालेल्या असतील तर त्या मान्य करतो व त्या स्वीकारून पुढे जाऊ लागतो.

neurological changes
Health Care News: गरोदरपणात 'या' पोषक पदार्थांचा आहारात समावेश करा; आईबरोबरच बाळही निरोगी राहील

बदल स्वीकारत समाजात मिसळणे

अचानक झालेल्या बदलाने काही काळासाठी व्यक्ती कोशात जाऊ शकते. काही काळासाठी आपल्या नातेवाईक मित्र मैत्रणींकडून दूर जाऊ शकते. कोण आपले कोण परके याबाबत संभ्रमास्थेत असू शकते. मात्र त्यातून हळूहळू बाहेर पडत आपण पुन्हा सामान्यपणे आपले जीवन जगायला सुरुवात करतो.

याविषयी डॉ.डॉ.निलेश पळसदेवकर म्हणाले, "अचानक झालेल्या बदलांमुळे मेंदूमध्ये होणारे हे बदल स्वाभाविक आणि नैसर्गिक आहेत. हे कोणत्याही सामान्य माणसाच्या बाबतीत घडू शकतात." अभ्यासक म्हणतात यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अनुवंशिकरीत्याच क्षमता प्राप्त झालेली आहे. याला मेंदूविकारात 'न्यूरोप्लास्टिसिटी' असे म्हणतात.

neurological changes
लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

पुन्हा आनंदाचा मार्ग स्वीकारण्यासाठी

या सगळ्या परिस्थतीतून योग्यरित्या बाहेर पाडण्यासाठी बाकीचे कसे वागत आहेत यासोबतच आपण काय करावे याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.

लॉटरीचे उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या कदाचित काही आर्थिक अपेक्षा आपल्याकडून असू शकतात मात्र त्याकडे लक्ष देत असताना आपण आपली गुंतवणूक कशी कुठे करावी यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्याला योग्य आणि विश्वासू वाटणाऱ्या माणसांची मदत घेऊन अचानक आलेल्या पैशांचे नियोजन करावे.

तर नकारात्मक घटनांमध्ये ज्या चुका झाल्यात त्या मान्य करत यातून कसे बाहेर पडू याचा विचार करणे आवश्यक आहे.

यात शेअर्स मध्ये पैसे हारल्याचे उदाहरण घेतल्यास पैसे कशामुळे हरले, तज्ज्ञांच्या मदतीने यावर काही मार्ग काढता येईल का? नेमक्या काय चुका झाल्या ज्या पुढे टाळता येतील या सगळ्याचा विचार करणे आवश्यक आहे.

या सगळ्यात स्वतःला शांत ठेवण्यासाठी दीर्घ श्वासाचे व्यायाम, योग्य आहार, आंनदी राहणे, गाणी ऐकणे या सगळ्या गोष्टी तुमचे काही काळासाठी हललेले आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आणण्यास मदत करेल.

--------

neurological changes
Harmful Habits For Brain : या 5 वाईट सवयींमुळे तुमचा मेंदू होऊ शकतो कमकुवत, वेळीच या सवयी सोडा नाहीतर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.