Health Research: आहारात भाज्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या महिलांना काय फायदा?

४८ हजार महिलांच्या अभ्यासातून माहिती समोर
Health Research : ४८ हजार महिलांच्या अभ्यासातून माहिती समोर
Health Research : ४८ हजार महिलांच्या अभ्यासातून माहिती समोर esakal
Updated on

मुंबई : तुम्हाला जर उतारवयात कोणत्याही दीर्घकालीन आजारांशिवाय जगायचं असेल तर त्याची सुरुवात तरुण वयापासूनच करा..

तीस वर्षाच्या दीर्घकालीन अभ्यासातून ही बाब समोर आलीय की, रोजच्या आहारात तीन टक्के शाकाहारातील प्रथिनांमुळे उतारवयात ३८ टक्के स्त्रिया या दीर्घकालीन आजारांपासून लांब राहतात राहून निरोगी आयुष्य जगतात.

४८ हजार महिलांवर केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

अमेरिकेतील टफ्ट्स संशोधन विद्यापीठाने (Tufts University) याबाबतचा अभ्यास केला आहे. 'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल नुट्रीशियन' (The American Journal of Clinical Nutrition) मध्ये १७ जानेवारी रोजी हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जीन मेयर यूएसडीए मानवी पोषण संशोधन केंद्राच्या संशोधकांच्या नेतृत्वात हा अभ्यास करण्यात आला आहे.

४८ हजार महिलांवर अभ्यास

४८ हजार महिलांनी दिलेल्या स्व अहवालातील डेटाचे विश्लेषण संशोधकांनी केले असता त्यांना असे आढळून आले की, ज्या महिलांनी त्यांच्या आहारात भाज्या, फळे, शेंगभाज्या, ब्रेड यांचा समावेश अधिक केला त्यांना हृदयरोग, कर्करोग, मधुमेह आणि मानसिक आरोग्य हे कमी प्रथिने घेणाऱ्यांच्या तुलनेत चांगले आढळून आले आहे.

१९८४ मध्ये ज्या महिलांचे वय ३८ ते ५९ या वयोगटातील होते आणि ज्या शारीरिक आणि मानसिकरीत्या निरोगी होत्या अशा ४८ हजार महिलांची यासाठी निवड करण्यात आली होती.

विविध संस्थांच्या मदतीने महिलांच्या खाण्याच्या डेटा यासाठी वापरण्यात आला आहे. १९८६ ते २०१६ पर्यंतच्या कालावधीत दर चार वर्षाने गोळा केलेल्या डेटाचा अभ्यास करण्यात आला आहे.

(plant protein plays an important role in the promotion of healthy aging and in maintaining positive health)

त्या महिला ४६ टक्के अधिक निरोगी

ज्यांना कोणतेही दीर्घकालीन आजार नाहीत आणि त्यांच्या मानसिक आरोग्य देखील चांगले आहे अशा महिलांच्या आहाराची देखील तुलना केली असता ज्या महिला अधिक प्रथिने असलेले अन्न खातात जसे की,भाज्या, फळे, पिझ्झा, तृणधान्ये, भाजलेले पदार्थ, मॅश केलेले बटाटे, शेंगदाणे, शेंगभाज्या, पीनट बटर आणि पास्ता त्या ४६ टक्के अधिक निरोगी असल्याचे समोर आले.

तसेच ज्यांनी मांसाहार जसे की, चिकन (chicken), दूध, मासे, समुद्री जीव (Sea Food) चीज, मांस असे पदार्थ खाणाऱ्या महिलांचाही अभ्यास करण्यात आला. या महिलांमध्ये निरोगी राहण्याचे प्रमाण हे ६ टक्क्याने कमी असल्याचे आढळून आले.

मांसाहारापेक्षा देखील भाज्यांमधील प्रथिने अधिक फायदेशीर

याबाबत संशोधक म्हणतात की, ज्यांनी प्रथिनांसाठी मांसाहारावर (non veg food) भर दिला आहे अशा महिलांमध्ये दीर्घकालीन आजारांचे प्रमाण कमी दिसून आले नाही तसेच प्रथिने खाल्ल्याने जी शारीरिक कार्य सुधारणे अपेक्षित असते तेही झालेले पाहायला मिळाले नाही.

हिरव्या भाज्या आणि पदार्थांपासून मिळणारी प्रथिने ही दीर्घकाळापर्यंत शरीरावर परिणाम करताना दिसतात तुलनेने मांसाहारातील प्रथिनांचे दीर्घकालीन परिणाम कमी दिसून आला.

(women diet for healthy life )

Health Research : ४८ हजार महिलांच्या अभ्यासातून माहिती समोर
Food For Childrens : हिवाळ्यात मुलांना पेरू खायला द्यावा की नाही? शंका दूर करण्यासाठी हे वाचाच

हृदयरोग, रक्तदाब, शरीरातील इन्शुलिनची पातळीसाठी भाज्यांमधील प्रथिने अधिक उपयोगी

संशोधनाच्या अनेक मॉडेल्समध्ये निरोगी आयुष्य आणि भाज्या यांचा थेट संबंध आढळून आला आहे. मुख्य म्हणजे हृदयरोग (heart disease) रक्तदाब (blood pressure), शरीरातील इन्शुलिनची पातळी,कर्करोग अशा सगळ्या रोगांना प्रतिबंधक अशी कामे या प्रथिनांमधून होत असल्याचे मिळाले.

तसेच दूध आणि दुग्धजन्य (milk and milk product) पदार्थ हे देखील स्वतंत्रपणे वृद्धकाळातील आरोग्याच्या निरोगी स्थितीशी संबंधित नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

याबाबत संशोधकांच्या चमूने असेही म्हंटले आहे की, केवळ प्रथिने घेण्यापेक्षा देखील भाज्या आणि फळे (green vegetables and fruit ) यांच्यातून मिळणारी प्रथिने अधिक फायदेशीर आहेत.

कारण ही केवळ प्रथिने नसतात तर त्यासोबत फायबर, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच मानवी शरीरासाठी फायदेशीर असणारी अनेक संयुगे यामध्ये असतात.

(How to get relief from chronic diseases? )

Health Research : ४८ हजार महिलांच्या अभ्यासातून माहिती समोर
Ira Khan Diet : आमिर खानच्या मुलीने केलं २० किलो वजन कमी, पण तिने हे कसं जमवलं ?

सर्व स्थरातील महिलांबाबत संशोधन झाल्यास अधिक समृद्ध होईल

हा अभ्यास करणारे संशोधक अर्डिसन कोरॅट यांनी यात अधिक वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीतून आलेल्या महिलांवर संशोधन व्हायला हवे असेही म्हंटले आहे.

हा अभ्यास हा प्रामुख्याने गोऱ्या नर्सेसवर करण्यात आला आहे.

हा अभ्यास भविष्यात सर्व स्थरातील महिलांबाबत झाल्यास अधिक समृद्ध होईल असेही त्यांनी सांगितले आहे.

वृद्धपकाळात निरोगी आणि दीर्घकालीन आजारांपासून वाचण्यासाठी भाज्या, फळे ही महत्वाची भूमिका बजावतात

कोरॅट म्हणतात की, महिलांनी प्रथिनांसाठी फळे, भाज्या, शेंगा असे अनेक पदार्थ जरूर खाव्यात आणि त्यासोबत बी १२ साठी आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी मांसाहार आणि मासे असे पदार्थ देखील खावेत.

पण वृद्धपकाळात निरोगी आणि दीर्घकालीन आजारांपासून वाचण्यासाठी भाज्या, फळे ही महत्वाची भूमिका बजावतात असेही ते सांगायला विसरले नाहीत.

------------

(Latest Research on protein diet) (Marathi article on healthy diet)

Health Research : ४८ हजार महिलांच्या अभ्यासातून माहिती समोर
Healthy Food for Healthy Mind :'हेल्दी माईंड' हवं असेल तर हेल्दी खा !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()