मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये जसे वेगवेगळे प्रयोग होत आहेत, त्याचप्रमाणे 'रियॅलिटी शो' प्रेक्षकांना आपले करून घेत आहेत. "बिग बॉस" हा शो हिंदीमध्ये गाजल्यानंतर तसाच प्रयोग मराठीतही करण्यात आला अन् त्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातील विजेतेही अनेक गोष्टींमध्ये खरच "बिग बॉस"च आहेत.
पहिल्या दिवसापासून अनेक नाती बनताना बघितली, तर जसे दिवस सरत गेले ती नाती बदलताना, बिघडताना, त्यांच्यामध्ये कटुता येताना प्रेक्षकांनी बघितले. बिग बॉस मराठीचे घर प्रत्येक सदस्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले.
कसे होते बिग बॉसचे घर
“मराठीपण” आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न या घरामध्ये केला. सेट डिझाईनपासून टास्क, वेगवेगळ्या
राऊंडमध्ये त्याची झलक दिसली. Weekend चा डाव याला चावडीचं स्वरूप देण्यात आले. हे मराठीपण जपण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.
पर्व पहिले : विजेती अभिनेत्री मेघा धाडे
मेघा धाडे जिने प्रेमानं सगळ्यांच मनं जिंकल आणि जिच्या खेळामध्ये जिद्दीचा कधीच अभाव दिसला नाही, जी पूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरली. कधी प्रेमाने तर कधी तिखट बोलण्याने पण खेळ उत्तमरीत्या खेळत स्वत:च स्थान टिकवून ठेवलं. रोखठोक बोलण्याने ती नेहमीच चर्चेत राहिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी तिला मिळाली आणि या पर्वाची विजेतीही ठरली.