small influencer
small influencer Esakal

मिलेनियर ठरलेल्या छोट्या इन्फ्लुएन्सर्सना भविष्यात मोठी आव्हाने? पालक याबाबत किती जागरूक?

छोट्या कन्टेन्ट निर्मात्यांना भविष्यात प्रामुख्याने मोठ्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो?
Published on

पुणे : ज्यात टाईमपास कन्टेन्ट शिवाय खरं तर काहीच नाही अश्या एका ८ ते १० वर्षाच्या छोट्याश्या मुलाने बनविलेल्या रिलला जेव्हा इंस्टाग्रामवर ३१ मिलियन म्हणजेच ३ कोटी १० लाख व्ह्यूज मिळतात.. एवढेच नाही तर त्याचे अनेक व्हिडीओज ज्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात.. त्याचे सगळीकडे कौतुक होते आहे, पैसा मिळतो आहे, प्रसिद्धी आहे.. एकुणातच सगळीकडे आनंदी आनंद आहे.. पालकांनाही कदाचित आपल्या मुलाचं हे कौतुक होताना डोळेभरून पाहावंसं वाटत असेल.. पण या सगळ्याकडे डोळे उघडे ठेऊन पाहण्याची देखील गरज आहे का?

पैसा, प्रसिद्धीच्या माध्यमातून ही चकचकीत बाजू , सर्वांना भुरळ घालणारी, आकर्षित करणारी असते.. पण याची दुसरी बाजू काय? या मुलांच्या भविष्यात दीर्घकाळापर्यंत या छान छान घडणाऱ्या गोष्टीच सुरु राहतील का? की काय त्यांना निराश करणारं देखील घडू शकतं? आणि घडलंच तर ते पेलायची त्यांची मानसिक तयारी असेल का? अपयश आलं तर ही नाजूक मनं ते पेलायला सक्षम आहेत का? आणि पैश्याची सवय लागणाऱ्या मुलांना पैसे नसेल तर पुन्हा गरजा कमी करून वागता येणे शक्य होईल का? एकुणातच ही आव्हाने त्यांना पेलणे शक्य होईल का, याचा विचार करण्यासाठीसुद्धा ही मुलं परिपक्व नाहीत.. मग ही जबाबदारी कोणाची? पालकाची? त्यांनी तरी याचा विचार केला आहे का?

या सगळ्याबाबत सायबर मैत्रच्या सहसंस्थापक मुक्ता चैतन्य यांच्याशी आम्ही संवाद साधला असता या चकचकीत आणि भुरळ घालणाऱ्या जगातील दुसऱ्या बाजूच्या आणि भविष्यातील धोक्यांविषयी त्यांनी सांगितले. त्या म्हणतात..

Loading content, please wait...