कैद्यांकडून पूर्ण झालेल्या आष्टीतील ऐतिहासिक तलावाची कहाणी!
कैद्यांकडून पूर्ण झालेल्या आष्टीतील ऐतिहासिक तलावाची कहाणी!- Esakal

...हा तलाव चक्क कैद्यांनी बांधून पूर्ण केला होता

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे २० फेब्रुवारी १८१८ मध्ये मराठे व ब्रिटिश यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात नरवीर बापू गोखले यांना वीरमरण आले. ही मराठेशाहीची शेवटची लढाई ठरली. आष्टीची लढाई म्हणून ही इतिहासात ओळखली जाते. याच ठिकाणी ब्रिटिशांनी ऐतिहासिक असा तलाव बांधला. या तलावाला येवती तलाव असेही संबोधले जाते.
Published on


महाराणी कैसर व्हिक्टोरिया यांनी १८७६ व ७७ च्या काळात आष्टीचा तलाव बांधला. या तलावाचे काम बारा महिने सुरू होते. या तलावाचे क्षेत्रफळ अडीच हजारमध्ये व्यापले असून या तलावाचे काम किती तरी महिने सुरू होते. दररोज या तलावावर दोन हजार कामगार काम करत. १८८१मध्ये पडल्या दुष्काळामुळे त्या तलावाचे काम अर्धवट राहिले. महाराणी कैसर व्हिक्टोरिया यांनी शेवटी ते काम कैद्यांकडून पूर्ण करवून घेतले.

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे २० फेब्रुवारी १८१८ मध्ये मराठे (Maratha) व ब्रिटिश यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात नरवीर बापू गोखले यांना वीरमरण आले. ही मराठेशाहीची शेवटची लढाई ठरली. आष्टीची लढाई म्हणून ही इतिहासात ओळखली जाते. याच ठिकाणी ब्रिटिशांनी (British) ऐतिहासिक असा तलाव बांधला. या तलावाला येवती तलाव असेही संबोधले जाते. (British Completed lake project with the help of jail inmates)

Loading content, please wait...