चला, आंबोलीची करूया सफर!

चला, आंबोलीची करूया सफर!

Published on

बेळगाव आणि गोवा या राज्यांना जोडणारा दुवा म्हणजे आंबोलीचा घाट. वनसंपदा आणि घनदाट जंगलाने नटलेला हा परिसर. पावसाळ्यात येथील फेसाळलेले धबधबे पाहण्यासाठी तर पर्यटकांची तोबा गर्दी उडतेच. पण तुम्हाला माहित आहे का? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील जंगलांतून फिरणे अवघड असते. मात्र हिवाळ्यात येथील निर्सगाचा आस्वाद घेत तुम्ही भटकंती करू शकता. चला तर मग आंबोलीची सफर करूयात.

पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्‍या दर्‍या. हिवाळ्यात गुलाबी थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्‍या अधिकच सुंदर दिसतात.

Loading content, please wait...