प्रीमियम महाराष्ट्र
देवगडच्या हापूसची चव आणि गंध मधूर कसा?
वातावरणातील आद्रतेमुळे आणि मातीतील वैशिष्टयपुर्ण लोह-पॉटॅशिअमचं प्रमाण यामुळेही देवगड हापूस वौशिष्टयपुर्ण ठरलाय
हापूस आंब्याची ‘रसाळ’ कहाणी-
उन्हाळा आणि आंब्याचे समीकरण अतूटच. बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत हा फळांचा राजा बहुतेकांना आवडतो. आंब्याच्या अनेक प्रजाती असल्या तरी हापूसचा दिमाख न्याराच. हापूस आंब्याची चव, रंग, गंध सगळेच कसे वैशिष्ट्यपूर्ण. त्यामुळे हापूसला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गोड चव, पिवळा रंग, दीर्घकाळ टिकणारा हापूस म्हणजे जणू काही आंब्यांचा राजा. कोकणातील रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस तसेच इंग्रजीत ‘अल्फान्सो’ म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. हापूसची रसाळ कहाणी जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. (Alphonso )