पोर्तुगीजांचा प्रभाव असूनही कॅथलिक जपतायत मराठी परंपरा ...
ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पॅलेस्टाईन (सध्याचा इस्रायल देश) येथील बेथलहेम येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. कॅथोलिक, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, आणि प्रोटेस्टंट पंथ आहेत. पण यातील ‘मराठमोळा ईस्ट इंडियन कॅथलिक समाज’ तुम्हाला माहित आहे का? ‘ईस्ट इंडियन्स’ किंवा ईस्ट इंडियन कॅथलिक हे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत व रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आहेत. ते प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड येथील मूळ निवासी आहेत. ईस्ट इंडियन्स हे पोर्तुगीजांच्या धर्म प्रचाराने प्रेरित आहेत, म्हणून त्यांच्या संस्कृतीत पोर्तुगीजाचांही थोडा प्रभाव आढळतो, परंतु त्यांनी आपली मराठी परंपरा व भाषा कायम ठेवली.