प्रीमियम महाराष्ट्र
वणवे घेताहेत जैवविविधतेचा घास.....
उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांचा कृषी क्षेत्रालाही सध्या मोठा फटका बसत आहे. नैसर्गिक कारणे अत्यंत कमी असली तरी शासन व स्थानिक पातळीवर याबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. नाहीतर पुढील काळात डोंगरांवरील सृष्टी दृष्टीस पडणार नाही. याला फक्त मानवच जबाबदार असले. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील.
'वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. पण याला मानवनिर्मित कारणांमुळे लागणाऱ्या आगीमुळे गालबोट लागत आहे. वणव्यांच्या घटनांमुळे जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव ऱ्हास पावत आहेत. वणव्यांमुळे डोंगर, टेकड्यांचा श्वास गुदमरत असून, ते भकास दिसत आहेत. (Forest Fires big threat to environment)
उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांचा (Forest Fire) कृषी क्षेत्रालाही सध्या मोठा फटका बसत आहे. नैसर्गिक कारणे अत्यंत कमी असली तरी शासन व स्थानिक पातळीवर याबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. नाहीतर पुढील काळात डोंगरांवरील सृष्टी दृष्टीस पडणार नाही. याला फक्त मानवच जबाबदार असेल. ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) वाढल्याने त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील