पुणे : पुण्याची जान्हवी इयत्ता पहिलीपासूनच घरातच शिकली... इयत्ता पहिली पासून शाळेची पायरी देखील न चढलेली पुण्याची जान्हवी आज 'पॉलिटिकल सायन्स' ची पदवी घेऊन बाहेर पडली आहे. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देत आहे.
होमस्कुलिंग म्हणजे घराच्या घरीच शिक्षण ही गोष्ट तशी आता नवी राहिलेली नाही.. पण होमस्कुलिंग करून बाहेर पडलेली पिढी नेमकी कशी घडली.. हा प्रवासाचा मोठा टप्पा पार पाडणं खरंच सोपं आहे का.. यातून जे व्यक्तिमत्व घडतं ते नेमकं कसं असतं.. नेहमीची शाळा आणि होमस्कुलिंग यात कसा फरक आहे.. पालकांसाठी हा प्रवास अवघड आहे की सोपा.. आणि सर्वात महत्वाचं होमस्कुलिंगने असं काय वेगळं दिलं... आपल्या प्रवासाबद्दल सांगतेय जान्हवी आणि तिची आई नीलिमा देशपांडे..