पुणे : प्रतिभा या शिक्षिका म्हणून एका शाळेत काम करतात. त्यांच्या शाळेतील शिक्षिकांनी एकत्र येत काही अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांचे अतिरिक्त तास घेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. काही काळ हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवला जाऊ लागला. पण या सगळ्याने प्रतिभा यांचा मानसिक ताण वाढल्याचे त्यांना जाणवले. आता हे त्यांना करणे शक्य नाही असे त्यांना वाटू लागले. पण त्यांनीच सुरु केलेल्या या उपक्रमातून आता त्यांनाच बाहेर पडणे अवघड झाले होते.
त्यांनी एक दिवस विचार पक्का करत ही गोष्ट सर्वांना सांगितली. त्यावेळी त्यांच्या सहकारी शिक्षकांमध्ये एक प्रकारची अवघडलेली शांतता त्यांनी अनुभवली. त्यांना भीती होती की त्यांचे सहकारी त्यांना जबाबदारी ढकलणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहतील. त्यांना या त्यांच्या निर्णयामुळे अत्यंत अपराधी वाटत होते पण त्यांना हा निर्णय घेणे आवश्यकही वाटत होते.
खूपदा आपल्यातील अनेकांसोबत अशा प्रकारच्या घटना घडतात की, आपण आपल्या सीमारेषा ठरवून घेतो. आपले प्राधान्यक्रम ठरवत असताना एखाद्या गोष्टीला दुय्यम स्थान देतो आणि त्यामुळे काही माणसं दुखावली जातात. त्यांचं हे दुखावलं जाणं हे खरं तर आपल्यासाठी देखील त्रासदायक असतं. कारण आपला हेतू त्यांना दुखावण्याचा नसून आपल्या काही कारणांमुळे किंवा मानसिक शांततेसाठी आपण हे करत असतो. पण हा सगळा गुंता न कोणालाही न दुखवता सोडवणे शक्य आहे?
तज्ज्ञ याकडे कसे पाहतात? या गोष्टी सकारात्मकतेने घेणे शक्य आहे? जाणून घेऊया या 'सकाळ प्लस' च्या लेखातून...