प्रीमियम महाराष्ट्र
एकल विवाह किंवा स्वत: वर प्रेम करण्याबाबत मानसशास्त्र काय म्हणतं?
क्षमा बिंदूच्या एकल लग्नानंतर या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली
विवाह हा भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा संस्कार मानला जातो. परंतु, सध्या बदल होत असलेल्या संस्कृतीमध्ये विवाहासाठी जोडीदार निवडीमध्येही बदल होत आहेत. त्यामध्ये समलैंगिक विवाह हा चर्चेचा मुद्दा आहे. त्यातच आता गुजरातमधील युवती क्षमा बिंदूने एकल (स्वत:शी) विवाह केल्याने हा विषयही चर्चेत आहे.
सोळा संस्कारांपैकी एक संस्कार असलेल्या विवाहाची ही बदलती रूपे अंगिकारतानाची उदाहरणे समोर येत आहेत. परंतु, या विवाहांना अजूनही कायदेशीर मान्यता नाही. अशा विवाहांची नोंदणी करणारा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला नाही. देशात असे अनेक विवाह होत आहेत. त्यांची गणना करणे शक्य नाही. बातम्या, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच असे विवाह समाजासमोर येत आहेत. पण या विवाहाचे भविष्य काय? असा प्रश्न अनेकांना आहे.