प्रीमियम महाराष्ट्र
ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांची संख्या वाढतेय, कारण...
वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास RTGS किंवा NEFT द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे
गेल्या काही वर्षांपासून केंद्रतील सरकारकडून नवीन तंत्रज्ञानाला नेहमीच प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाला. मग ते सरकारी असो कि खासगी क्षेत्र. अधिकाअधिक सोयी-सुविधा आणि सेवा ऑनलाइन कशा दिल्या जातील यावर भर देण्याचे काम झाले. आज त्यांचे महत्व नागरीकांनाही पटत चालले आहे. खिशात पैसे न ठेवताही अगदी एक रूपयापासून ते लाखो रूपयांचे व्यवहार करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे केंद्र, राज्य असो कि स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थांनी देखील काळानुरूप हळूहळू का होईना त्या दृष्टीने बदल करण्यास सुरू केली. मात्र त्याला नागरीकांचा झापाट्याने प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. हे महावितरणच्या वीज बिल ऑनलाइन भरण्याऱ्या ग्राहकांच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून आले.