प्रीमियम महाराष्ट्र
तामिळनाडूतील गोविंदपुरमला पंढरपूर समजल जातं...
या मंदिरात दररोज नित्यनेमाने सर्व कार्यक्रम होतात, काकड आरती, हरिपाठ संकीर्तन होते
''कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू'' , हा अभंग आपण अनेकदा ऐकला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचा लळा खूप आधीपासून कर्नाटकमधील भाविकांना आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तेलंगणा, आंध्रप्रदेशबरोबर तामिळनाडू राज्यांतील दक्षिण भारतीय संप्रदायाच्या भाविकांनाही आता विठुरायाच्या भक्तिचे वेड लागले आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायिक संतांचे विचार, त्यांचे अभंगाचा व्यासंग अन्य भाषिकही करू लागले आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यात या दक्षिण भारतीय संप्रदायातील ज्येष्ठ महंत विठ्ठलदास महाराज यांनी चक्क तुकोबारायांच्या चरित्र तमिळमध्ये सांगितले. त्यातील अभंग मात्र अगदी अस्खलित वारकरी संप्रदायिक चालीतून त्यांनी गायिले. त्यावेळी महाराष्ट्रातील संतमांदियाळीच्या विचारांची परिसीमा काय आहे, याचा प्रत्यय आला.