-पूजा चौधरी
पत्रिकेतील राशी ग्रह, तारे, योग यांवर तुमचा विश्वास नसेलही परंतु प्रत्येकजण उत्सुकता म्हणून का होईना रोजच्या वर्तमान पत्रात येणारे राशीभविष्य वाचतो. प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या आद्याक्षरावरून व्यक्तीची राशी ठरत असते. आणि प्रत्येक राशीला स्वभाव असतो त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेता येतो. १२ राशींचे स्वभाव वैशिष्टये , उत्तम करिअरचे क्षेत्र, उद्भवू शकणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी याबाबद्दलची थोडक्यात माहिती या बारा राशींच्या वर्णनातून वाचता येईल.
१. मेष राशी :
राशी स्वामी- मंगळ
भाग्यवर्षे- २८
अधिदेवता- गणपती
बोधचिन्ह- मेंढा
स्वभावाने तापट, मानाने दिलदार , व्यवहारी वृत्तीचे, लवकर रागावणारी, बेधडक वृत्ती, कामात काटेकोर, चंचल स्वभावाचे, आर्थिक नियोजन उत्तम करणारे, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणारे, सडेतोड वागणं आणि बोलणं, बाह्य जगात रमणारे, समविचारी लोकांमध्ये मिसळणारी, परोपकारी, दुसऱ्यावर हुकूमत गाजवणारी, महत्वाकांक्षी असलेली राशी, कोणत्याही समस्येला घाबरून न जाता परिस्थितीशी दोन हात करणारे असतात.
निर्णय घेताना तडकाफडकी आणि तत्परतेने घेतात. भावनेच्या आहारी जात नाही. दुसऱ्यावर बाजू सहजपणे उलटतात.
कार्यक्षेत्र- पोलीस खाते, गुप्तखाते, वैमानिक, व्यापारी, बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणारे, लष्करी अधिकारी, खेळाडू.
आरोग्य- रोगप्रतिकार शक्ती उत्तम, उष्णतेचा त्रास, तोंड येणे, डोळे लाल होणे, पित्ताचा त्रास.