प्रीमियम महाराष्ट्र
''त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यामधला लक्षवेधी बाण होता... ''
दीदी आपल्यातून शरीररूपानंच गेल्या आहेत; पण हजारो गाण्यांमधून, स्वतःच्या आचरणातून त्यांनी जे काही मागं ठेवलंय ते कधीही संपणार नाही
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर लतादीदींबरोबर एक गाणं गात होते. त्यात दीदींनी एक शब्द गाण्याच्या ओघात असा काही उच्चारला, की ते चक्क त्यांची पुढची ओळच विसरले. ज्या एका शब्दामुळे सुरेश वाडकर त्यांचं गाणं विसरले, त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यांमधल्या लक्षावधी बाणांपैकी एक बाण होता. हा बाण होता गाण्यामधल्या अभिनयाचा. एकेक शब्द जिवंत करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा. नेमकी काय होती ही प्रतिभा?