(Maharashtra Assembly Election 2024 formula after Haryana Election Result explained Marathi Article by Sunil Chawke)
सुनील चावके
हरियानाच्या निकालाने महाविकास आघाडीतील समीकरणांवर परिणाम होणार हे उघड आहे. जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू होण्यापूर्वीच बाजू लंगडी झालेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा लढण्याची महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी लागण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हरियानाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार काय, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. हरियानाच्या धक्कादायक निकालाने केवळ काँग्रेसचेच नव्हे तर महाराष्ट्रात सत्तेत परतण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या महाविकास आघाडीच्याही मनोबलाला धक्का लागला आहे.
हरियानातील काँग्रेसच्या पराभवाची कारणे जसजशी पुढे येत आहेत, तसतसा महाविकास आघाडीच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष हा ओझे ठरणार की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.