पुणे - मी शेअर्स मधील गुंतवणुकीसाठी काही साईट्सवर फ्री रजिस्टर्ड केले होते तेव्हापासून मला सतत आमच्या या स्कीममध्ये पैसे गुंतवा, त्या स्कीममध्ये पैसे गुंतवायचे कॉल आणि मेसेजेस येतात.. तर ऑनलाईन खरेदी करताना अनेकदा चुकीची किंमत दिली जाते, ती वस्तू प्रत्यक्षात तितक्या रुपयांना नसतेच असे कितीतरी प्रसंग मी सांगू शकीन..
रोज इन्शुरन्स घ्या म्हणून खूप कॉल येतात.. एकदा मी फक्त एका साईटवर जाऊन चौकशी केलेली तेव्हापासून अक्षरशः रोज एक ते दोन कॉल 'पैसे गुंतवा' चे असतातच.. मुख्य म्हणजे माझे 'डू नॉट डिस्टर्ब' (DND) ऍक्टिव्हेट आहे तरीही मला असे कॉल्स येतातच असे अर्चना जाधव सांगत होत्या.
मी सहज फेसबुक चाळत असताना मला एक खूप छान फ्रॉक दिसला. किंमत पण कमी होती. दिवाळी देखील जवळ आलेली होती. मला मुलीला कपडे घ्यायचेच होते, म्हणून मी ऑनलाईन पैसे भरून फ्रॉक मागवलेला पण मला अजूनही ना फ्रॉक आला ना माझे पैसे परत मिळाले.
मुख्य म्हणजे मला ती जाहिरात देखील परत दिसली नाही. त्यानंतर मी ऑनलाईन शॉपिंग प्रकार बंदच केला.. असं सबुरी पवार सांगत होत्या.
तुम्हालाही असा काही अनुभव आला आहे का? अनेक ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या या वस्तूंची विक्री करत असताना किंवा काही सर्व्हिस पुरविणाऱ्या कंपन्या ग्राहकांना 'मिसलीड' करताना दिसतात.
त्यातून आर्थिक फसवणूकही होते पण रक्कम फार नसल्यामुळे त्यांच्याविरोधात कोणी तक्रार करताना दिसत नाही. केंद्रीय ग्राहक सुरक्षा अधिकार (Central Consumer Protection Authority) ने या 'डार्क पॅटर्न्स' (Dark patterns) विषयी २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
'डार्क पॅटर्न्स' विषयीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील गोष्टींचा उल्लेख
१) False Urgency : अनेकदा वस्तू खरेदी करताना ओन्ली १ लेफ्ट, ४ लेफ्ट असे मेसेज दिसतात. त्यासोबतच आत्ता हे प्रोडक्ट ३० लोकं पाहत आहेत अशा गोष्टी ' फॉल्स अर्जन्सी' या प्रकारात येत असून त्यातून ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते.
२) Basket Sneaking: एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर बिल पेड करत असताना अचानक प्लॅटफॉर्म फी , चॅरिटी रक्कम अशी रक्कम आपल्या बिलामध्ये जोडली जाते. किंवा एखादे सौन्दर्य प्रसाधन घेतले तर त्याची मेंबरशिप दिली जाते. किंवा विमानाचे तिकीट घेताना त्याच्यासोबतच विमा रक्कम जोडूनच घेतली जाते.
३) Confirm Shaming: एखादा ग्राहक म्हणालाच की, मला चॅरिटीसाठी १ रुपयांची रक्कम नाही द्यायची तर त्या व्यक्तीला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे ते करण्यास भाग पडणे. "आजपर्यंत याला नकार कोणीच दिला नाही, तुम्हीच एकमेव आहात जे नाही म्हणत आहात" अश्या ट्रीक वापरून त्यांना पैसे देण्यास भाग पाडणे.
४) Forced Action : ग्राहकाने पुरविलेल्या माहितीचा वापर करून त्यांना सातत्याने आपले उत्पादन किंवा सेवा घेण्यास भाग पाडणे. हा प्रकार घर शोधण्याच्या प्रक्रियेत अनेकदा दिसतो. घर मिळाले तरीही अमुक तमुक सर्व्हिस घ्या म्हणून फोर्स केला जातो.
५) Subscription Trap: एखादे सब्स्क्रिशन कॅन्सल करायचे असल्यास त्याची प्रक्रिया अतिशय किचकट ठेवणे, कॅन्सलचा पर्याय न दिसणे, सब्स्क्रिशन कालावधी ऑटो डेबिट करून वाढविणे असे अनेक प्रकार होताना दिसतात.
६) Interface Interference : एखाद्या अँप मधून बाहेर पडताना बाहेर पडण्याचा पर्याय चुकीच्या पद्धतीने दर्शिविणे, त्यातून संभ्रम निर्माण करणे, रंगसंगती चुकीची वापरणे.
७) Bait and Switch: सुरुवातीला एखादे प्रोडक्ट कमी पैशात दाखवणे आणि जेव्हा त्यावर क्लिक केले जाते तेव्हा अनेकदा ते प्रॉडक्ट तिथे नसते किंवा आधी दाखवलेल्या किमतीपेक्षा महाग असते तर कधी आऊट ऑफ स्टॉक दाखवते.
८) Drip Pricing: एखादी सेवा किंवा प्रॉडक्ट जोपर्यंत कन्फर्म करत नाही तोपर्यंत त्याचे पैसे न सांगणे, चुकीचे पैसे आकारणे, सर्व्हिस अपग्रेड करताना आधीची सर्व्हिस नीट न देणे या सर्व गोष्टी केल्या जातात. खासकरून इंटरनेट सुविधा, मेट्रोमोनी याबाबत हे दिसून येते.
९) Disguised Advertisement: चुकीच्या पद्धतीने माहिती देणे जेणेकरून एखादी व्यक्ती कृती करण्यास प्रवृत्त होईल. एखादी माहिती लेख स्वरूपात देत त्याची जाहिरात करणे.
१०) Nagging : ज्या कृतीने येणारा ग्राहक सातत्याने डिस्टर्ब होईल अशा कृती करणे हे या नॅगिंग प्रकारात येते. यात सतत नोंदणी करा अशी मागणी, फोन नंबर देण्याची मागणी, कुकीज एक्सेप्ट करण्याची मागणी आदी गोष्टी या प्रकारात येतात.
११) Trick Question: शब्दाचे खेळ करत काही असे प्रश्न विचारणे जेणेकरून ग्राहक संभ्रमित होऊन समोरच्याला अपेक्षित असे उत्तर मिळेल. यामुळे अनेकदा घाईघाईत कंपनीच्या फायद्याची उत्तरे ग्राहक देतात.
१२) Saas Billing: सास म्हणजे 'सॉफ्टवेअर ऍज सर्व्हिस'. यामध्ये ग्राहकाच्या नकळत त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कापण्यात येतात, याचं नोटिफिकेशन देखील दिलं जात नाही. नकळतपणे तुमच्या व्यवहारात एखादी गोष्ट जोडली जाते.
१३) Rogue Malwares: या प्रकारात तुम्ही एखाद्या माहिती देणाऱ्या किंवा उत्पादनाच्या वेबसाईटवर क्लीक करता पण तुम्ही वेगळ्याच लिंकवर जात. त्यातून तुम्हाला बाहेर पाडण्यासाठी पैशाची मागणी केली जाते किंवा व्हायरस आहे असे सांगत पैशांची मागणी होते.
कंपन्यांनी मार्गदर्शक तत्वे न पाळल्यास?
ज्या कंपन्या या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणार नाही त्या ई कॉमर्स कंपन्यांना दंड भरावा लागू शकतो असे केंद्रीय ग्राहक सुरक्षा अधिकार मंडळाने जून महिन्यात सांगितले होते. ग्राहकांच्या हित लक्षात घेत ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत त्यामुळे याचे पालन न करणाऱ्या कंपनीनवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
यासाठी राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाईन १९१५ ही देण्यात आला आहे. जर अशा प्रकारचे मिसलीड दिसून आले तर ग्राहकांना तक्रार करता येणार आहे.
ई कॉमर्स कंपन्यांची बाजू काय?
याबाबत कोणत्याही मोठ्या ई कॉमर्स कंपनीने वैयक्तिकरित्या समोर येत आपली जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र 'एशियन इंटरनेट कोलिशन' या इंटरनेटशी संबंधित व्यक्तींची बाजू मांडणाऱ्या संस्थेने याविषयात केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयातील सह सचिवांना याबाबत ५ ऑक्टोबर रोजी पत्र लिहीत यावर आपली बाजू मंडळी आहे. १६ पानी पत्रात त्यांनी निर्णयाचे स्वागत करत आपले मत व्यक्त केले आहे.
ग्राहकांना काय वाटतं ?
याबाबत अर्चना जाधव म्हणाल्या, ग्राहकांना सर्व्हिस देताना ई कॉमर्स कंपन्यांनी खरी सर्व्हिस देणे जास्त चांगले. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता टिकून राहील.
एखाद्या गोष्टीबाबत ग्राहकांना चुकीचा अनुभव आला तर ग्राहक त्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे यावर मार्गदर्शक तत्व जाहीर झाली त्यातून जनतेला फायदा होईल अशी अशा आहे. पण हे पूर्ण थांबेल का, याबाबत मात्र अजूनही शंकाच आहे.
-------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.