नीलेश निमकर
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदीसह तीन भाषा शिकवण्यात याव्यात, अशी शिफारस ‘राज्य अभ्यासक्रम आराखड्या’त करण्यात आली आहे. या शिफारसीला राजकीय आणि सांस्कृतिक अंगाने विरोध होणे साहजिकच. पण या पलीकडे जाऊन असे निर्णय घेताना शिक्षणशास्त्राचा आणि जमिनीवरील वास्तवाचा विचार करणेही आवश्यक आहे. मुलांच्या भाषाशिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांची चर्चा व्हायला हवी.