Global warming
Global warming E sakal

विशिष्ट रचनेत वड-पिंपळ लागवड, तापमानवाढ रोखण्यास करणार मदत...

वड, पिंपळ, अशोक, बेलफळ आणि आवळा या देशी वृक्षांपासून पंचवटी निर्माण
Published on

होय, बदलता पाऊस आणि बदलते तापमान यातून दुष्काळ, महापूर यामुळे समाज आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि इतर अनेक समस्यांत भरडला जात आहे आणि भविष्यात तर मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात येईल की, काय अशी स्थिती आहे. शिवाय भूजलाविषयी अज्ञान आणि पाणी व्यवस्थापनातील ढिलाई महाराष्ट्रास वाळवंटीकरणाडे अधिकच गतीने नेत आहे. जलसंधारण असो की, वृक्ष लागवड, पर्यावरण क्षेत्रात निव्वळ उत्सवीकरण करून चालणार नाही, त्यातून समाज व प्रशासन गाफील राहून पैसा, परिश्रम आणि वेळ वाया जात आहे.

सहज जलबोधकारचे उपेंद्र धोंडे याबाबत म्हणाले, ‘जागतिक हवामान बदलावर मात करण्यासाठीच्या अनेक उपायांपैकी एक आहे, सहज जलबोध अभियानांतर्गत कृती कार्यक्रम निसर्गबेट निर्माण आणि याच धर्तीवर लहान क्षेत्रासाठी एक वृक्ष लागवड उपक्रम आहे ‘पंचवटी निर्माण’. अगदी तीन गुंठे इतक्या कमी आकाराच्या जागेपासून ते एकरभर जागेवर उत्कृष्ट पंचवटी निर्माण होऊ शकते. पंचवटी हा एक उद्यान प्रकार आहे, यात वृक्ष लागवड ही घनवन पद्धतीने होत नाही. त्यामुळे, इथे वृक्ष संख्या महत्त्वाची नाही. परंतु, तरी देखील जागतिक हवामान बदलावर उपाय म्हणून याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Loading content, please wait...