आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र

वास्तविकतः आळंदीच्या दहा किलामीटर परिसरात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळे आहेत. जी अनेकांना परिचित नाहीत. त्यांना भेट दिल्यास ज्ञानात भर तर पडणार आहेच, पण विरंगुळाही मिळणार आहे.
आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र
Updated on

Unfamiliar religious and tourist Places in Alandi :आळंदी म्हटलं की आठवते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अर्थात माउलींचे संजीवन समाधी मंदिर. अनेक वारकरी भाविक भक्तांच श्रद्धास्थान. वारकरी संप्रदायाचा पाया रोवलेलं तीर्थक्षेत्र. त्यामुळे आळंदीत नेहमीच वर्दळ असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह लगतच्या गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, गुजरात, राजस्थान, तमीळनाडू, केरळ आदी राज्यातील भाविक आळंदीत येत असतात. पर्यटक व शालेय सहलीही दरवर्षी येतात. मात्र, संजीवन समाधी मंदिर, माऊलींनी भिंत चालवल्याचे ठिकाण. संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग आणि महान तपस्वी संत चांगदेव महाराज ज्या झाडाखली थांबले होते, ते विश्रांतवड स्थळ. या व्यतिरिक्त आळंदीत येणाऱ्यांना फारसी माहिती नाहीच. ते सरळ देहूकडे किंवा भीमाशंकरकडे किंवा परतीच्या मार्गावर निघतात. वास्तविकतः आळंदीच्या दहा किलामीटर परिसरात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळे आहेत. जी अनेकांना परिचित नाहीत. त्यांना भेट दिल्यास ज्ञानात भर तर पडणार आहेच, पण विरंगुळाही मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.