भारतीय संस्कृतीत अनादिकालापासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. आदिशक्तीचा जागर करत तिची मनोभावे पूजा करण्यास आपण प्राधान्य देतो. मात्र, ही परंपरा जपत असताना मागील महिनाभरात घडलेल्या मुंबई पुण्यातील घटना संवेदनशील मनाचे हृदय पिळवटून टाकत आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आपल्या भोवताली घडणाऱ्या अत्याचार, बलात्कारांमुळे स्त्रीला आपण खरेच दुर्गा देवीचे रूप मानतो का? सध्याच्या डिजिटल युगात वावरताना पुरुषी अहंकाराची राक्षसी मनोवृत्तीमुळे अजून किती क्षितिजांचे आयुष्य फुलण्याअगोदरच कोमेजणार आहे? महिलांना अजूनही दुय्यम मानणाऱ्यांची मानसिकता उग्र रूप धारण करत आहेत. याबाबत पुन्हा गांभीर्याने विचारमंथन करण्याची गरज निर्माण झाली आहे.