रासायनिक खताच्या दुष्परिणामावर 'नॅनो युरिया' चा पर्याय
रासायनिक खताच्या दुष्परिणामावर 'नॅनो युरिया' चा पर्यायesakal

रासायनिक खताच्या दुष्परिणामावर 'नॅनो युरिया' चा पर्याय

रासायनिक खतांमुळे हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी नॅनो युरिया वापर उपयुक्त आहे.
Published on
Summary

रासायनिक खतांमुळे हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी नॅनो युरिया वापर उपयुक्त आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होऊ लागली आहे. तसेच जमिनीचे प्रदूषण झाल्याने जमिनीतील सूक्ष्म जीवांना धोका निर्माण झाला आहे. या अनुशंगाने नॅनो युरिया हा यावरील पर्याय असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कृषी संशोधकांच्या मते नॅनो युरिया हे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त खत आहे.

भारतात १९६५-६६ मध्ये हरितक्रांतीच्या कालावधीत रासायनिक खतांचा वापर वाढवण्यात आला. पण आता त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. प्रदूषणामुळे भावी पिढीला आरोग्यदायी अन्न पुरवणे हे एक मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत संशोधकांनी विविध पर्याय शोधण्यावर भर दिला आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यातच जमिनीतील सूक्ष्म जीवांना धोका पोहोचल्याने पाणी, हवा आणि जमिनीचे प्रदूषण वाढल्याने पुढच्या पिढीला पोषक, सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी पर्याय शोधण्याची गरज आहे. यातूनच आता संशोधकांनी शोधलेल्या नॅनो खतांचा विचार होऊ लागला आहे.

नॅनो युरिया आहे तरी काय?

नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक युरियाच्या घटकास नॅनो युरिया असे म्हटले जाते. पारंपरिक युरियाला नॅनो युरिया हा पर्याय होऊ शकेल आणि ५० टक्क्यांनी युरियाचा वापर कमी करू शकेल, असा संशोधकांचा दावा आहे.

उसातील साखरेचे प्रमाण वाढल्याचा दावा

इराणमधील शहीद चामरन विद्यापीठातील संशोधकांच्या मते उसामध्ये नॅनो युरियाचा वापर फायदेशीर ठरतो. नायट्रेटची गळती रोखल्यामुळे उसातील साखरेचे प्रमाण वाढते, तसेच यामुळे होणारे पाणी आणि जमिनीचे प्रदूषण कमी होते, असा दावा महमुद अलीमोहम्मदी, इब्राहिम पन्हपौर, अब्दली नासेरी या संशोधकांनी केला आहे. या संदर्भातील त्यांचे संशोधन माती विज्ञान आणि वनस्पती पोषण या शोधपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()