अलीकडील काळात देशभरातील महागड्या शहरात पुण्याचा समावेश झाला आहे, याची माहिती अनेकांना आहे. शिक्षण, वाहनउद्योग, आयटी क्षेत्र यामुळे पुण्याच्या लौकिकात भर पडली. मात्र, या साऱ्यांचा परिणाम म्हणून पुण्यात राहणं, हेही महागडं होऊ लागलं आहे. सगळ्याच गोष्टींच्या महागाईमुळे किंमती वाढत असल्याने पुण्यातील खड्डे तरी त्याला का अपवाद ठरावेत. तुम्ही बरोबर वाचलंय. इतर गोष्टींबरोबरच पुण्यातील खड्डेही खूप महाग झाले आहेत. पुण्यात दर महिन्याला दोन कोटी रुपये खड्डे बुजवण्यावर खर्च होतो आणि एवढा खर्च करूनही पुण्यातील खड्डे काही कमी होत नाहीत. एका वर्षात सर्वसाधारणपणे २५ कोटी रुपये फक्त खड्डे बुजवण्यावर महापालिका खर्च करीत असते.