Super Mom - कहाणी एका 'डायपर' निर्मिती उद्योगाची...
प्रसाद घारे
‘आई’ ही दोन अक्षरे उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर जी व्यक्ती उभी राहते, तिचे वर्णन अनेकांनी लेखांतून, कथेतून, गाण्यातून आणि कवितेतून करण्याचा प्रयत्न केला; मात्र ही दोन अक्षरे कशातच न मावणारी आहेत.
१९६६ च्या ‘दादी माँ’ या चित्रपटातील मन्ना डे, महेंद्र कपूर यांच्या आवाजातील ‘उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी, ऐ माँ तेरी सूरतसे अलग, भगवान की सूरत क्या होगी,’ या संपूर्ण गाण्यात आईचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे. Success Story of Nashik Super Mom Pallvi Utagi maker of infant friendly diapers
‘आई’ या शब्दात इतका अर्थ दडलेला आहे, तर ‘आई’ होणे Motherhood ही संकल्पनाच किती मोठी आहे हे वेगळे सांगायला नको. म्हणूनच आई होणे म्हणजे ‘फिरूनी नवी जन्मेन मी...’ अशाच एका आईने आपल्या बाळासाठी केलेल्या प्रयत्नातून एका उद्योजिकेचा Business Women जन्म झाला. सुपर मॉम पल्लवी उटगी यांची ही यशोगाथा...