गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे; संशोधनाचा निष्कर्ष
गायीचे गोमूत्र हे औषधी आहे. त्यामुळे यामध्ये असणारे घटक जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. वासरू, दुभती गाय आणि गाभण गायीच्या या अवस्थामध्ये गोमूत्रामध्ये आढळणाऱ्या घटकांचे प्रमाणही भिन्न असते. यावर संशोधकांनी अभ्यास करून त्याचे प्रमाण मांडले आहे. याबद्दल माहिती देणारा हा लेख...
जनागड कृषी विद्यापीठामध्ये १२ देशी गीर गायींची गोमूत्रावर संशोधन करण्यात आले. यामध्ये वासरू, दुभती गाय आणि गाभण राहिलेली गाय यांचा समावेश होता. जवळपास सुमारे चार आठवडे गोमूत्रातील घटक तपासण्यात आले. यात गाभण गायीमध्ये युरिया, फिनॉल आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण दुभत्या गायीपेक्षा जास्त असल्याचे आढळले. जुनागडच्या बायोकेमेस्ट्री विभागातील एच. आर. रामाणी, एन. एच. गारनिया आणि बी. ए. गोलकिया या संशोधकांचा या संदर्भात एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. तसेच याच संदर्भात यवतमाळ येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागाच्या सुमित अडे, विनय काथोले, समित खानगर, राहुल ताकपे यांचाही शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.