पुणे : माझी मुलगी सहावीला आहे. तिचे आयसीएसई बोर्ड होते. या वर्षी ती सातवीला गेली पण सहावीला तिला शास्त्र हा विषय फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विभागात विभागलेला होता. असे मिळून तिला एकूण अकरा विषय होते. इतक्या लहान वयाला एवढा अभ्यास झेपणारा नव्हता. तरीही ती करत होती, पण आम्हाला असे वाटत होते की शाळा, क्लास अभ्यासाचे तिच्यावर खूप ओझे होत होते.
तिला अन्य कोणत्याही गोष्टी करण्यासाठी वेळच मिळत नव्हता त्यामुळे यावर्षी आम्ही तिचे बोर्डच बदलण्याचा निर्णय घेतला असे सायली मगर (नाव बदलले आहे.) आपली मुलगी राहीविषयी सांगत होती. ती म्हणाली माझी लहान मुलगी रुही दुसरीला त्याच शाळेत आहे तिचंही बोर्ड बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, कारण तिलाही तो अभ्यास झेपत नाहीये..