जी ७सारखी अत्यंत महत्त्वाची परिषद इटलीत होते आहे. भारताचा त्यातील सहभागही अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या सोशल मीडियावर ट्रेडिंग काय तर #Melodi #bhabhi असे हॅशटॅग.
मोदी आणि मेलोनी यांच्या जोडीच्या चर्चा तर नेटकरी करत आहेतच म्हणूनच मोदी+मेलोनी म्हणजे मेलोडी हा हॅशटॅग आणि मेलोनी यांना भाभी संबोधत तो हॅशटॅग भारतीय नेटकऱ्यांनी ट्रेंड केला.
दुसरीकडे जॉर्जिया मेलोनी यांनी कोणत्या राष्ट्रप्रमुखाचे स्वागत कसे केले याच्या चर्चा रंगतायत, नमस्कारच का केला त्यामागील महत्त्व काय याबद्दल लोक बादरायण संबंध जोडत पोस्टी पाडत आहेत.
खरंतर मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि हे पद ग्रहण केल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा इटलीत होत असणाऱ्या जी७ परिषदेतील आहे.
या परिषदेत जी७ देशांमध्ये सहभाग नसतानाही भारताला आदराने बोलावलं जातं आहे. इथे भारताच्या मताचा विचार होतो आहे. जगभरातील महत्त्वाच्या राष्ट्रांच्या यादीत भारताला बसवलं जात आहे त्यामुळे निव्वळ #Melodi #bhabhi असे हॅशटॅग ट्रेंड करण्यापलिकडे या परिषदेला अत्यंत महत्त्व आहे.