प्रसिद्ध आयकॉन्सना आपल्या विचारधारेच्या किंवा विकासधारेच्या साच्यात घालून त्यांना जणू काही हायजॅक करण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे. काय आहे यामागचं राजकारण, समाजकारण आणि जनमानसातील त्याचं प्रतिबिंब.....काँग्रेस म्हणजे गांधी-नेहरू, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार असं राजकारणातील समीकरण पक्कं झालं होतं. या पक्षांची ओळखच या व्यक्तिमत्त्वांमुळे होती आणि आहेसुद्धा. त्यांच्या विचारांचा आणि राजकारणाचा वारसा पक्षाला मिळालेला असतो. पण आता नेमका त्यावरच घाव घातला जात आहे. पूर्वी पक्ष सोडल्यानंतर नेता आपली इमेज आणि तिचे बरेवाईट संचित घेऊन जात असे पण आधी शिंदे आणि आता अजित पवार गटाचं उदाहरण बघता पक्षाचं आणि त्या पक्षाच्या नेतृत्त्वाचं संचितच हे गट उचलताना दिसतात. .Devendra Fadnavis Video : ''उद्धव ठाकरे, केजरीवाल जिलेबीसारखे वाटतात'' फडणवीसांच्या उत्तराने हशा.एकीकडे हे असं तर दुसरीकडे एखाद्या प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या विचारातले, लिखाणातले नेमके आणि बरेचदा सोयीस्कर मुद्दे वेचून त्या व्यक्तिमत्त्वाला आपल्या विचारसरणीच्या ढाच्यात बसवण्याचा प्रयत्न करणे. यालाच दुसरं नाव आहे, आयकॉन्स हायजॅक करणे. आपल्या पक्षाच्या किंवा आपल्या गटाच्या विचारधारेप्रमाणे किंवा विकासधारेप्रमाणे प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्त्वांचा वापर करून घेणे. .अर्थात एखाद्या राजकीय व्यक्तिमत्त्वांचा अशाप्रकारे वापर होणं आपल्याला काही नवीन नाही. अशा नेत्यांच्या विचारांचे पाईक केवळ आपणच आहोत आणि आपणच काय ते त्यांची आठवण ठेवणारे एकनिष्ठ अशी लोकांची धारणा करून देण्याकडे आता कल दिसतो. अशाप्रकारे आयकॉन्स हायजॅक करण्याविषयी मोठा आरोप होतो तो संघ-भाजपवर. वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे आयकॉन्स संघाने आपल्याकडे वळवले किंवा पळवले असा आरोप कायमच होतो. त्याविषयी बोलताना महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर म्हणतात, मुळात आयकॉन्स हायजॅक करणं, ही संज्ञाच चुकीची आहे. राष्ट्रपुरुष हे सगळ्यांचे असतात. त्यांच्या विचारांचा प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावत असतो. मग एखाद्या पक्षाने, गटाने किंवा व्यक्तीने संबंधित नेत्याचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर काय चूक? बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्त्वासाठी मोठं काम करून ठेवलं आहे, शिंदे साहेबांना त्या विचारांचा वारसा पुढे न्यावासा वाटतो मग त्यात काय चूक आहे? उलट ते स्वागतार्ह आहे. .तर ज्येष्ठ पत्रकार रवी आमले म्हणतात, संघाकडे मोठ्या पातळीवरील नेते कधीच नव्हते. मग इतर राष्ट्रपुरुषांच्या विचारांतील नेमकं तेच काढून, ते आपल्या विचारांचे असल्याचं दाखवलं जातं. वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस अगदी आंबेडकरसुद्धा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जाणुनबुजुन आता वल्लभभाई पटेलांना नेहरुंच्या विरोधात उभं केलं जातं. राजकीय फायद्यासाठी हे सगळं चालू असतं. राष्ट्रवादीतील बंडखोरीच्या मुद्द्याबद्दल बोलायचं झालं तर अजित पवारांनी मोठं धाडस केलं आहे, असं आमले म्हणतात. कारण शिंदे शिवसेना वादात बाळासाहेब हयात नव्हते. इथे शरद पवार स्वत: हयात आहेत, कार्यरत आहेत. शरद पवारांचं राजकारण राज्यपातळीवर येताना आकसत गेलं, कुठेतरी त्यांनी मुलीला झुकतं माप दिलं असा संदेश गेला आणि मग आधी काकांचं आणि मग बहिणीचं ऐकायचं हे अजित पवारांना नकोसं वाटलं. आज त्यांच्याकडे भाजपचा पाठिंबा आहे, पक्षातलेच आमदार-खासदार आहेत. पण राष्ट्रवादीचं गुडविल, पवारांचं संचित जर त्यांना हवं असेल तर इथे त्यांना अन्यायग्रस्त असल्याचं सिद्ध करावं लागेल. म्हणूनच तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा दोष का, अशाप्रकारचं वक्तव्य ते करतात. पवारांवर हल्ला चढवल्याशिवाय हे साध्य होणार नाही. सत्तेचा पाठिंबा असल्याने त्यांना हे शक्य होतंय. शिवाय अजित पवारांच्या हाती अजून वय आहे, आमदार, खासदारांचा गट आहे. ते जर सत्तेच्या वळचणीला राहिले तर त्यानिमित्ताने अनेकांना आपला विकास साधता येणार आहे. त्यामुळे या गटालाही पाठबळ मिळतंय. .ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणतात, भावनिक राजकारण हे सगळ्याचं मूळ आहे. लोकांना आपल्या जगण्यामरण्याच्या प्रश्नापेक्षाही भावनिक राजकारणात जास्त रस असल्याचं दिसतं. त्यात सोशल मीडियामुळे तरुणाईच्या डोक्यात काहीही भरवणं सोपं झालं आहे. एखादी खोटी गोष्ट फोटो, व्हिडीओ, पोस्टच्या माध्यमातून सतत लोकांच्या मनावर बिंबवत राहिल्याने त्यांना तीच खरी वाटायला लागते. त्यामुळेच वल्लभभाई पटेलांवर नेहरुंनी अन्याय केला. नेहरुंच्या कुटुंबियांनी सगळी सत्ता आपल्याच हाती ठेवून देशाचं नुकसान केलं या गोष्टी लोकांना खऱ्याच घडल्यासारख्या वाटतात. .''मी घडाळ्याकडे बघतच नाही... इथून पुढे राष्ट्रवादीचा झेंडा...'' अजित पवारांसमोरच मुख्यमंत्री हे काय बोलले? Eknath Shinde.चोरमारे पुढे म्हणतात की, अस्मितांवर आघात करणं नाहीतर त्या पळवणं हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये जास्त दिसत आहे. २०१४ला मोदी लाटेचा प्रभाव होता, २०१९ साली पुलवामाचं भावनिक आवाहन होतं. आता २०२४ला निवडून यायचं असेल तर मग पाकीस्तान वगैरे नेहमीचे मुद्दे आता चालायचे नाहीत, मग पटेल, बोस यांच्यासारख्या नेत्यांच्या चरित्राचे आणि त्यांनी हिंदुत्त्ववादाबद्दल केलेल्या वक्तव्याचे दाखले देत त्यांना आपल्या पक्षाच्या विचारधारेशी जोडलं जातंय. सोशल मीडियाबद्दल ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरींचं मत वेगळं आहे. ते म्हणतात, उलट सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळं काही खुलं झालं आहे. लोकांना नेहरु, पटेल असोत नाहीतर बोस या सगळ्यांचं प्रत्यक्ष चरित्र वाचता येऊ शकतं. त्यांनी लिहीलेली पुस्तकं वाचून तरुण त्यांच्या विचारसरणी समजून घेऊ शकतात. गांधी आणि बोस यांचं भांडणं झालं होतं म्हणून बोस काही गांधींचा तिरस्कार करत नव्हते. ना गांधी त्यांचा तिरस्कार करत होते. एखाद्या कुटुंबातल्या बाप आणि मुलाचं जसं भांडण होतं तसं त्या दोघांचं झालं असेल. वैचारिक मतभेद होते, मनभेद नव्हे. त्यामुळे गांधी हे बोस यांचे शत्रू होते, हे लोकांना सांगणं आता सोपं राहिलेलं नाही. सोशल मीडियाचा गैरवापर केलेल्या लोकांवरच आता त्यांचं हे शस्त्र उलटतं आहे. .मात्र प्रतिमा केव्हा पळवली जाते, याचा विचार केला तर लक्षात येतं जेव्हा ती मोठी असते, उदात्ततेची डूब तिला दिलेली असते. त्यामुळेचे हे आयकॉन्स पळवण्याच्या राजकीय खेळात व्यक्तिमहात्म्य प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसतं. मग ते बाळासाहेब असतील किंवा आनंद दिघे नाहीतर शरद पवार ही कितीही मोठी असली तरी ती माणसंच आहेत शेवटी त्यांच्याही चुका झाल्याच असणार. पण आपणच त्यांच्या विचारांचे खरे पाईक असं सांगताना कधी कधी त्यांच्या चुकांचंही उदात्तीकरण होताना दिसतं. याविषयी विनायक आंबेकर म्हणतात, आपण भारतीयांची मानसिकताच व्यक्तिपूजेची आहे. पहिल्यापासूनच. त्यामुळेच तर एका घराण्याचं राजकारणातील प्राबल्य आपण इतके वर्ष स्वीकारलं. तो प्रभाव टिकू लागला. पण आता लोकं शिकली, सुशिक्षित झाली. त्यामुळे त्यांना इतरांच्या भूमिकाही समजू लागल्या. अशावेळी त्यांच्यासमोर न आलेले पटेलांचे पैलू किंवा बोस यांचे समाजकारण, राजकारण, हिंदुत्त्ववादाविषयीचे विचार आम्ही प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मग चांगलंच आहे की. .या अशा राजकारणाच्या आणि प्रतिमांच्या खेळांविषयी राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ विश्वंभर चौधरी म्हणतात, संघ आणि भाजपचं उद्दिष्ट हिंदुत्त्व आहे. मात्र तिथेही गांधींना टाळून त्यांना पुढे जाता येत नाही. अगदी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरही. गांधीजींनी हिंदुंमध्ये प्रार्थनेची एक सोपी सामूहिक पद्धत जनमानसांत रुढ केली. एकाअर्थी त्यातलं ब्राम्हण्य आणि त्या वर्गाचं वर्चस्व काढून टाकलं. नाहीतर त्याआधी देवळात जाणं, सणांच्या निमित्ताने विशिष्ट जनसमुदायाने एकत्र येणं रुढ होतं. इतरधर्मीयांत असलेली एकत्र प्रार्थनेची पद्धत गांधींजीनी रुढ केली. रघुपती राघव राजाराम हे भजन गाणारे गांधी तर मरतानासुद्धा 'हे राम' म्हणाले होते. मात्र गांधींचा राम आणि संघ-भाजपने प्रोजेक्ट केलेला राम वेगळा आहे. संघ-भाजप जोडीकडून चेरी पिकिंग म्हणजे फायद्याचं किंवा सोयीस्कर उचलण्याचा प्रकार कायमच केला जातो. उदा. सरदार वल्लभभाई पटेल. आज जरी भाजप त्यांचा उदो उदो कर असला तरी संघावर पहिली बंदी पटेलांनी घातली होती. पटेल हे अहिंसावादी होते. गांधीजी तर पटेलांना ‘अहिंसेचा हिंसक पुजारी’ असं म्हणत. त्यांचं हे असं अहिंसक असणं भाजप आणि संघाला पटेल काय? देशांतर्गत संघ-भाजपच्या अनुयायांकडून ज्या गांधींना प्रचंड विरोध होतो, त्याच गांधींचं नाव घेऊन मोदी परदेशात जातात. कारण तिथे अजूनही हा देश गांधी-नेहरुंचा देश म्हणून ओळखला जातो. शिवाय एकीकडे कट्टर हिंदुत्त्ववादी म्हणताना भाजप बिनदिक्कत सत्तेसाठी दुसऱ्या पक्षांचा पाठिंबा घेताना दिसतो. त्यामुळेच संघ-भाजपची वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष आचरण यात अंतर दिसते. .बदलत्या राजकीय समीकरणांवर भाजपने कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादीबरोबर सरकार थाटण्याबद्दल आंबेकर म्हणतात, त्यांचे आणि आमचे विचार वेगळेच आहेत. भाजपची वैचारिक भूमिका आणि राष्ट्रवादीची भूमिका यात फरक राहणारच आहे. ते केवळ सरकारमध्ये आले आहेत, आमच्या पक्षात नव्हे. सरकार स्थापन करताना सत्तेच्या राजकारणात अशा तडजोडी, सहकार्याच्या भूमिका घ्याव्याच लागतात. भाजप आणि या पक्षांची युती झालेली आहे. ते पक्ष भाजपमध्ये विलीन झालेले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.