राहुल गधपाले
सत्तांतराला देशाचे खरे स्वातंत्र्य मानणाऱ्यांनी स्वातंत्र्याची गळचेपी करण्याची एकही संधी सोडली नाही. समतेचे मूल्य त्यांना उमगलेच नाही; त्यामुळे या काळात असमानतेची दुखणी उफाळून वर आली. बंधुत्वाच्या ठिकऱ्या उडवण्यात कुठलीही कसूर राहिली नाही.
शिवाय, भांडवलशाहीप्रधान अर्थकारणामुळे समाजाचे सरळ सरळ दोन भाग झाले. केवळ आपल्या पोळीवर तूप वाढून घेण्याची मानसिकता असलेल्या काही मूठभर टाळक्यांनी प्रचंड अशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या आपल्या परंपरागत व्यवस्थेलाच हादरा दिला. आज त्यांनी आपल्यापुढे वाढून ठेवलाय तो केवळ एक दुर्धर वर्तमान...