लखनौ : पंतप्रधानपदाचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो अशी चर्चा दिल्लीत नेहमीच रंगते. लोकसभेत ८० खासदार उत्तर प्रदेशमधून निवडून जातात. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला भरभरून मतदान करणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये यंदा मोदी- योगीच्या नेतृत्वाखालील भाजपची वाताहत झाली आहे. योगींचा करिष्मा, मोदींचा मतदारसंघ, अयोध्येत राम मंदिर अशा वातावरणातही भाजपला २०२४ मध्ये अवघ्या २२ जागांवर समाधान मानावं लागले. यामागचे कारण हे शोधण्याचा प्रयत्न केला तर मोदींभोवती निवडणूक लढवणाऱ्या भाजपला सर्वसामान्यांचे प्रश्न, अखिलेश यादव यांच्यासारख्या विरोधकाला कमी लेखणे, बेरोजगारी असे मुद्दे भोवले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मधून नरेंद्र मोदी हे ४ लाख ७९ हजार मतांनी निवडून आले होते. तर या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे त्याच मतदार संघातून १ लाख ५२ हजार मतांनी निवडून आले आहे. या आकड्यांमधूनही त्यांच्या मतदार संघात त्यांची लोकप्रियता कमी झाली हे स्पष्ट होते आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रमाणात भाजपाची लोकप्रियता कमी झाली त्यामागे नेमकी कोणती गणिते समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी मंडळी आणि त्यात त्यांना कसे यश मिळाले याचीच चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे