पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ चा प्रचार अखेर संपला असून आता सर्वांनाच निकालाचे वेध लागलेले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते यंदाच्या निवडणुकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच ऑनलाईन माध्यमांचा मोठा उपयोग करण्यात आला.
या माध्यमातून कोट्यवधींच्या जाहिराती करण्यात आल्या. पण कोट्यवधींच्या म्हणजे किती? फेसबुक आणि इंस्टाग्रामची मदर कंपनी असलेल्या मेटा कंपनीने याबाबतचा अहवाल सर्वांना उपलब्ध (public domain ) करून दिला आहे. या आकडेवारीतून भारताच्या राजकारण आणि अर्थकारण याचा किती जवळचा संबंध आहे याची कल्पना येते.
मेटाच्या एकूण जाहिरातीत देखील सर्वाधिक पुढे या राजकीय पक्षांच्या नावाने उघडलेल्या पेजवरून देण्यात आलेल्या जाहिराती आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या खर्चाबाबत प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठेवून दिलेली असताना मात्र हे आकडे त्याच्या कितीतरी पटींना ओलांडणारे ठरलेले आहेत.