मणिपूर : मणिपूरमध्ये महिलेची विवस्त्र धिंड काढण्याचा प्रकार घडल्यानंतर एकुणातच मणिपूर भारतभर चर्चेचा विषय ठरले आहे. सध्या मणिपूरमधून हिंसेच्या बातम्या येत नसल्याने तेथील वाद शांत होत आहे अशी सर्वांची धारणा झाली आहे. मात्र गुरुवारी २० जून रोजी 'द हिंदू' शी बोलताना आसाम रायफलचे डायरेक्टर जनरल प्रदीप चंद्रन नायर यांनी म्यानमार मधील नोव्हेंबर २०२३ पासून भारताच्या आश्रयाला आलेले ५ हजार निर्वासितांना पुन्हा मायदेशी पाठविण्यात येणार आहे असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेविरोधात कुकी समाजातील नागरिकांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. तसेच भारत आणि म्यानमार या देशांच्या सीमेवर भिंत घालण्याच्या विरोधात मणिपूरमधील कुकी समाजातील नागरिकांनी एकत्र येत गुरुवारी भारत सरकारच्या या निर्णयाविरोधात मोठा मोर्चा काढला होता. यामुळेच आता मणिपूरमध्ये पुन्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकुणातच मणिपूरमध्ये ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली आहे? येथील दोन समजांमधील वाद काय आहे? शेजारच्या म्यानमार देशाचा याच्याशी काय संबंध? आणि अजूनही परिस्थिती निवळण्याचे नाव का घेत नाहीये? सरकारची भूमिका काय? आरक्षणाचा मुद्दा का महत्वाचा? आणि इथलं आंतरराष्ट्रीय ड्रॅगचं काय प्रकरण आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.