आदिवासी तरुणाने पेटवलेली स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी!

आदिवासी तरुणाने पेटवलेली स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी!

Published on

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सन १८५७ च्या उठावाला मोठे स्थान आहे. तत्कालीन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरोधात पुकारलेला तो लढा इतिहासाच्या पानात ‘पहिले स्वातंत्र्यसमर’ म्हणून ओळखला गेला. पण, पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आदिवासी बांधवांनी इंग्रजांच्या जुलमी शासनाविरोधात उठावाची ठिणगी पेटवली होती, तीही १८५७ च्या लढ्याच्या कित्येक वर्षे आधीच. विशेष म्हणजे, इंग्रजांविरोधातील हा उठाव एका आदिवासी वीराने थेट सरकारला पत्र पाठवून जाहीर केला होता.

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एन.टी.आर. आणि मेगासुपरस्टार चिरंजीवी यांचा सुपुत्र रामचरण यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गितावरील नृत्याच्या ठेक्याची सध्या क्रेझ आहे. या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दक्षिणेतील स्वांत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधीरित, मात्र काल्पनिक असल्याची चर्चा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असे अनेक वीर होऊन गेले आहेत की, ज्यांना इतिहासाच्या पानात मानाचे स्थान मिळालेच नाही किंवा अनेकांच्या कथा काळाच्या ओघात लुप्त झाल्या. असे अनेक स्वातंत्र्यवीर देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत की, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिली. पण, त्यांचे हे बलिदान जगासमोर आले नाही. इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने ज्यांच्या नोंदी व्हायला हव्यात, अशा अनेक वीरांच्या गाथा आहेत. अशीच एक कथा ‘आरआरआर’ या सिनेमात मांडली आहे. यापूर्वीही अनेक चित्रपटांमधून अशा कथा मांडल्या गेल्या आणि प्रेक्षकांच्या त्या पसंतीलाही पडल्या आहेत.

खरं तर अशा अनेक कथा भारतमातेच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या आहेत. ज्या उजेडात येणे गरजेचे आहे. असाच एक वीर पुणे आणि नगर या जिल्ह्यात होऊन गेला. आदिवासी समाजातील नागरिक त्यांना देव म्हणूनच मानतात. त्यांचे नाव आहे, राघोजी भांबरे. आद्य क्रांतिवीर म्हणून आदिवासी समाज त्यांच्याकडे पाहतो. नगर जिल्ह्यातील अकोले परिसरात त्यांच्या शौर्याच्या कथा लोकगीतातून आजही अजरामर आहेत. पण, या वीराचा इतिहास तसा दुर्लक्षितच राहिला. मात्र, आज पुणे, ठाणे, नगर, पालघर या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या संघटना त्यांचा इतिहास समाजासमोर जोरकसपणे मांडत आहे.

Loading content, please wait...