पुणे - पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थानचे मतदान उद्या मतपेटीत बंद होणार आहे. राजस्थानमध्ये एकीकडे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे भाजपच्या (BJP) बाजूने मैदानात आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री असलेले अशोक गेहलोत सारखे ज्येष्ठ नेते काँग्रेसचा (congress) चेहरा आहेत.
मागीलवर्षी काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे राजस्थानात काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या वेळी काँग्रेसने मागील निवडणुकांच्या तुलनेत जास्त ताकद लावल्याचे दिसते आहे. तर भाजपने गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी मोदी, योगी आदित्यनाथ, जे पी नड्डा यांसारखे सर्व नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणूक
मतदार संघ : २००
मतदार संख्या : ५ कोटी २६ लाख ८० हजार ५४५
सध्या कोणत्या पक्षाचे सरकार? : काँग्रेस
मुख्य लढत कोणामध्ये? : भाजप आणि काँग्रेस
मतदान कधी? : २५ नोव्हेंबर २०२३
मागील निवडणुकीत (2018) कोणाला किती जागा ?
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - ९९
भारतीय जनता पक्ष - ७३
बहुजन समाज पक्ष - ६
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष - ३
इंडियन नॅशनल काँग्रेस - १३
अन्य - ५
यंदा भाजपच्या जाहीरनाम्यात काय?
१) पीएम किसान सन्मान निधी १२०० करणार
२) मुलीच्या जन्मानंतर २ लाखाचा सेव्हिंग बॉण्ड
३) उज्वला योजनेतील गरीब महिलांना ४५० रुपयांमध्ये सिलेंडर
४) तरुणांना २.५ लाख सरकारी नोकऱ्या
५) महिला सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस सटेशनला महिला ठाणे
६) गरीब विद्यार्थ्यांना केजी ते पीजी शिक्षण मोफत
७) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ वर्ष मोफत रेशन
८) ४० हजार करोड गुंतवणुकीतून 'भामा शहा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन' सुरु करणार
यंदा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
१) कुटुंबातील महिला प्रमुखाला वर्षाला १० हजार रुपये देणार
२) गायीचे शेण २ रुपये किलोने विकत घेणार
३) सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणार
४) दुष्काळापासून वाचण्यासाठी १५ लाखाचा मोफत विमा देणार
५) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सरकार मोफत शिक्षण देणार
६) १०.४ मिलियन कुटुंबांना ५०० रुपयात गॅस सिलेंडर देणार
७) इंदिरा रसोई अंतर्गत इंदिरा थाळी ८ रुपयांना देणार
८) जुनी पेन्शन स्कीम लागू करणार
सिलेंडर आणि महिला विषय पक्षांच्या अजेंड्यावर का?
दोन्हीही प्रमुख पक्षांकडून राजस्थानात महिलांच्या मुद्द्यावर जास्त भर देण्यात आला आहे. याचे कारण एकूण ५ कोटी २६ लाख मतदार राजस्थानात असून त्यापैकी पुरुष मतदार हे २ कोटी ७३ लाख आहेत तर महिला मतदार या २ कोटी ५१ लाख आहेत. यातून महिला मतदारांना आपल्या बाजूने वाळविण्यासाठी हे जाहीरनामे दिसतात.
तसेच सिलेंडर हा मुद्दा गेल्या काही काळात चांगलाच चर्चेत राहिलेला विषय आहे. त्यामुळे महागाई आणि महिला असे दोन्ही मुद्दे एकाच योजनेत कव्हर करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केलेला पाहायला मिळतो.
वसुंधराराजेंना डावलल्याचा फटका भाजपला दिसणार का?
वसुंधरा राजे (Vasundhara Raje) या राजस्थानात दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या लोकप्रिय नेत्या आहेत. राजस्थानातील राजकारणात त्यांना महत्व आहे. मात्र पक्षातील अंतर्गत वादामुळे गेला काही काळ त्या भाजपच्या कार्यक्रमात बॅकफूटवर दिसल्या.
निवडणुका तोंडावर येऊनही भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदासाठी राजे यांचा चेहरा जाहीर न केल्याचा फटका भाजपाला येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील नाराजीनाट्य मतावर परिणाम करणार?
सचिन पायलट (Sachin Paylat) हे एकेकाळी काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून समोर आले होते. मात्र मधल्या काळात त्यांच्या विश्वासार्हतेबाबत पक्षांतर्गत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशोक गेहलोत आणि त्यांच्यातही फारसे बरे संबंध नाहीत ही गोष्ट जगजाहीर आहे.
मात्र तरीही या दोघांना मानणारा स्वतंत्र वर्ग आहे. मात्र त्यांच्यातील वादामुळे भविष्यात यांच्यात दुफळी निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेत मतदारांना असल्याने याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो.
गुजराती आणि मारवाडी चा मुद्दा किती चालणार?
महिला सुरक्षा, दलित अत्याचार या विषयाचा सूर काँग्रेस विरोधात भाजपने सुरवातीलाच आळवला होता. त्यातच हिंदुत्व हा मुद्दा भाजपचा मुद्दा आहेच. पण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुकीचा प्रचार थेट गुजराथी आणि मारवाडी या विषयावर गेला.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदींवर घणाघात करताना गेहलोत म्हणाले, "एक गुजराती राजस्थान में आकर वोट मांगता है, तो मे कहाँ जाऊंगा ? " यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा मुद्दा थेट जातींवर येऊन थांबताना दिसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.