मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....
भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, गरीब मुला-मुलींना शिक्षण, अंध, पंगू, रोग्यांना औषधं, बेकारांना रोजगार, पशू-पक्ष्यांना, मुक्या प्राण्यांना अभय, दु:खी व निराशांना हिंमत, आणि गरीब तरुण-तरुणींचे लग्न हा संत गाडगेबाबांचा रोकडा धर्म. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे त्यांचे ‘धर्मकारण’.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या संत तुकारामांच्या अभंगातील जातकुळीशी नातं सांगणारे गाडगेबाबांचे धर्मकारण आहे. यात धर्माचे अवडंबर नाही..नक्की काय होती गाडगेबाबांची धर्मकारणाची व्याख्या.....