प्रीमियम व्यासपीठ
गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....
संतांनी विषमतेचा उभा मनोरा आडवा करून सर्वांना समान पातळीवर आणून ठेवले, हीच हिंदू धर्मात झालेली ऐतिहासिक क्रांती होती
धर्माच्या चौकटीत राहूनच वारकऱ्यांनी हिंदू धर्मातील विषमतेविरुद्ध बंडखोरी केली. पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. त्यात सर्व जाती, धर्मांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले. त्यातून शूद्र ठरविल्या गेलेल्या वर्गाला आत्मसन्मान आणि प्रेम मिळाले. सवतासुभा मांडून संघर्ष केल्यास निष्प्रभ व्हावे लागते, हा लिंगायत आणि महानुभवांचा अनुभव त्यांच्या समोरच होता. त्यामुळे वारकरी संतांनी धर्मात राहूनच अत्यंत विनम्रपणे बंडखोरी केली.