गणेशाला आद्य दैवत म्हणून संबोधले जाते. संपूर्ण जगभर गणेशाची उपासना व पूजन केले जाते. व्यापार व सांस्कृतिक कारणांमुळे भारतीय लोक जगभर फिरत होते. त्यामुळे हिंदू संस्कृतीचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर झाला. परदेशांत शिक्षणासाठी, रोजगाराच्या निमित्ताने गेलेले व तेथेच स्थायिक झालेले भारतीय मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात
भारतीय संस्कृतीचा प्रभाव ज्या देशांवर पडलेला आहे. त्या सर्व देशात गणेश पूजेची परंपरा प्राचीन आहे. भारताच्या पश्चिमेला तुर्कस्तानपासून ते पूर्वेला जपानपर्यंत, उत्तरेला चीनपासून श्रीलंकेपर्यंत गणेशपूजा केली जाते..त्या विषयी घेऊयात जाणून...