प्रीमियम व्यासपीठ
एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व
उर्दू, पर्शियन आणि हिंदीमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा मूळ अर्थ भारतात राहणारी व्यक्ती, असा आहे; पण आता त्याचा अर्थ हिंदू धर्माचा अनुयायी, असा झाला आहे.
डॉ. सुजात अली कादरी
उर्दू, पर्शियन आणि हिंदीमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा मूळ अर्थ भारतात राहणारी व्यक्ती, असा आहे; पण आता त्याचा अर्थ हिंदू धर्माचा अनुयायी, असा झाला आहे...अन्य धर्मिय नक्की कसा पहात आहेत हिंदुत्वाकडे......
हिंदुत्व म्हणजे हिंदू असणे किंवा हिंदू असण्याचा गुण धारण करणे होय. ही विचारधारा भारतात हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. याला ‘हिंदू राष्ट्रवाद’ असेही म्हटले जाते. काही भारतीयांची अशी आग्रही भूमिका आहे, की हिंदुत्व ही एक सांस्कृतिक संज्ञा आहे, जिचा संबंध भारत या राष्ट्र-राज्याच्या पारंपरिक आणि मूल वारशाशी आहे. हाच आधार घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे राजकीय वाटचाल करीत असल्याचे दिसते. (Hinduism in the eyesy of Sufi Scholar)