हातातला Mobile आणि समोरचा Computer केव्हा बंद करायचा याचं हवं भान!
sप्रा. सुषमा भोसले
आपण जे काम करतो आहोत ते खरंच आपल्याला करायचं आहे का, हे थोडं थांबून, थोडा वेळ काढून पाहायला हवं हे नक्की! वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी, भान राखण्यासाठी आळस सोडून कृतिशील राहणं आवश्यक आहे...काय करायला हवं यासाठी?.....How to make Time management and improve efficiency
एक मिनीट म्हणजे ६० सेकंद पण बऱ्याचदा आपण "एक मिनीट थांब" किंवा "पाच मिनिटाचे तर काम" असं म्हणतो; पण बोलतो त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ घेतो. मीटिंग Meeting किंवा सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या वेळी उपस्थित राहात असताना हमखास उशीर Late आपण केलेला असतो; पण बऱ्याचदा सिग्नल तोडून एक सेकंद वाचविण्याचा प्रयत्न केलेला असतो अन् पुन्हा वेळच मिळत नाही, वेळ पुरत नाही ही वाक्य बोलताना आपण अधूनमधून पेरतच असतो.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील 'वेळ' हा अत्यंत महत्त्वाचा व अदृश्य घटक आहे Time Management. सध्याच आपलं जीवन इतके गतिमान व स्पर्धेचे झालेले आहे की वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे निरोगी जीवनशैलीसाठी Healthy Lifestyle आवश्यक ठरत आहे. प्रत्येक भाषेत वेळेचं महत्त्व पटवून देणाऱ्या म्हणी व वाक्प्रचार आहेत. मुळात 'वेळेचं नियोजन' हा शब्द व्यवस्थापकीय परिभाषेतून आलेला आहे.