मंत्रपुष्पांजलीचा अर्थ आणि श्लोक कोणत्या ग्रंथातून घेतलेत माहितीये?
मूर्त परमेश्वराबद्दलची भक्ती आणि आदरभाव व्यक्त करण्यासाठी अनेक विचारधारांमधून उत्क्रांत झालेला पूजाविधी हिंदू धर्मानं स्वीकारला. या पूजाविधीचा अंतीम भाग म्हणजे मंत्रपुष्पांजली- षोडशोपचार पूजेमधला शेवटचा, सोळावा उपचार
श्रीगणपती पूजनानंतर मंत्रपुष्पांजली म्हणून देवांच्या मूर्तीवर फुलं वहाण्याची प्रथा आहे. त्यावेळी जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांचे मूळ संदर्भ शोधून मंत्रांचा अर्थ सर्वसामान्य व्यक्तीला समजावा म्हणून हा प्रयत्न केला आहे.