खगोलविज्ञानाच्यादृष्टीने स्कंध म्हणजे खांब म्हणजे अक्ष. स्कंध म्हणजे पृथ्वीचा अक्ष. सहा तोंडे म्हणजे सहा दिशा. पृथ्वीवर पाऊस पूर्वीही पडतच असावा..
नीलेश ओक, अटलांटा, अमेरिका
ऋषी पंचमी म्हणजे केवळ सप्तर्षींचे स्मरण करण्याचा दिवस नाही, तर त्याचा थेट संबंध खगोलशास्त्राशी आणि भारतीय मॉन्सूनशी जोडला जातो. हा नेमका संदर्भ काय आहे याचा थोडक्यात ऊहापोह...
ऋषी पंचमीचा संबंध शेतीची निर्मिती आणि शाश्वतता याच्याशी आहे. मॉन्सून स्थिर होण्याशी आहे. हवामान, भूशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या पुराव्यांनुसार सांगता येते, की इसवीसनापूर्वी २८ हजार वर्षे म्हणजे तीस हजार वर्षांपूर्वी भारतीय मॉन्सून स्थिर झाला. भारतवर्ष म्हणजे फिलिपिन्सपर्यंत पूर्वेला आणि पश्चिमेला वाळवंटीय भूभागापर्यंतचा प्रदेश.