Sant Sevalal Maharaj : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांचा जीवन प्रवास माहितीये का?

श्री संत सेवालाल महाराज जगभरा बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहे.
Sant Sevalal Maharaj
Sant Sevalal Maharajesakal
Updated on
Summary

संत सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ व निधन ४ डिसेंबर १८०६ मध्ये झाले. बंजारा समाजाचे संत म्हणून ते ओळखले जातात.

-विनोद राठोड, उमदी

Sant Sevalal Maharaj Journey Teachings : गौर बंजारा समाजातील (Gor Banjara Community) सामान्यांची संत सेवालाल महाराजांना (Sant Sevalal Maharaj) चिंता होती. त्यांनी सामान्यांची सेवा व कल्याणाचा विचार केला. संत सेवालाल यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील (Anantapur Andhra Pradesh) गुठी तालुक्यातील गोलाल डोडी या गावात झाला. हे गाव आता सेवागड म्हणून ओळखले जाते. त्यांचा आज जयंती उत्सव देशभरात जिथे-जिथे बंजारा समाज आहे, तिथे-तिथे साजरा केला जातो. त्यानिमित्त..

पोहरादेवी महाराष्ट्राच्या वाशीम (Washim) जिल्ह्यातील एक गाव. पोहरादेवी (Pohradevi) प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. येथे जगद्‌गुरू संत सेवालाल महाराज, तसेच माता जगदंबादेवीचे मंदिर आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे माजी मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा भारतीय कृषिक्रांतीचे प्रवर्तक वसंतराव नाईक, ‘जलसंधारण’चे जनक सुधाकरराव नाईक यांनीही भेट दिली आहे. पोहरादेवी येथे धर्मगुरू संत रामराव महाराजांची समाधी आहे. पश्चिमेकडे उमरीगड हे संत सामकी मातेचे मंदिर आहे.

Sant Sevalal Maharaj
संत सेवालाल महाराज सभागृहासाठी 15 लाख : पालकमंत्री पाटील

संत सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ व निधन ४ डिसेंबर १८०६ मध्ये झाले. बंजारा समाजाचे संत म्हणून ते ओळखले जातात. नाईक कुळातील भीमा नाईक यांचे ते चिरंजीव. वडील श्रीमंत होते. बंजारा समाजाची प्रगती करावी, अशी इच्छा सद्‌गु‍रू श्री सेवालाल महाराजांची झाली. लहानपणापासूनच आई धरमणी मातेकडून वीरांच्या कथा ऐकल्या. त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. गौर-बंजारा सिंधू संस्कृतीशी संबंधित मानले जातात. समाज वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.

महाराष्ट्रातील बंजारा, कर्नाटकातील लामणी, आंध्रमधील तल्लाडा, पंजाबमधील बाजीगर, उत्तर प्रदेशमधील नाईक समाज व्यापारी राजे, सम्राटांना रसद (अन्नधान्य) पुरवत. गौर बंजारा समाजातील सामान्यांची संत सेवालाल महाराजांना चिंता होती. त्यांनी सामान्यांची सेवा व कल्याणाचा विचार केला. संत सेवालाल यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. हे गाव आता सेवागड म्हणून ओळखले जाते.

Sant Sevalal Maharaj
बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज एक जागृत विद्यापीठ-अ‍ॅड.रामराव नाईक

श्री संत सेवालाल महाराज जगभरा बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहे. त्यांनी समाजात असलेल्या प्रत्येकाला चांगले जगण्याचा मार्ग दाखविला. भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गात असलेल्या समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवला. त्या काळात समाजासाठी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळातसुद्धा लागू पडताहेत.

कौटुंबिक माहिती व बालपण

रामजी नायक यांचा मुलगा भीमा व्यापारी होता. अनेक भारतीय भाषांचे ज्ञान होते. त्यांच्याकडे ४ ते ५००० गायी, बैल होते. त्यांचा वापर धान्याच्या वाहतुकीसाठी केला जात असे. ते ५२ तांड्यांचे नायक होते. त्यांना नायकडा (एक गावचा नायक वा खेड्यांचा नायक) असे म्हटले जाई. सेवालाल यांच्या आईचे नाव धरमणी होते. ती जयराम बदाटिया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची मुलगी. लग्नानंतर त्यांना १२ वर्षे मूलबाळ नव्हते. पुढे, जगदंबामातेची पूजा व कृपेमुळे त्यांच्या पोटी सेवालाल महाराजांचा जन्म झाला.

Sant Sevalal Maharaj
परमेश्वराचा शोध घेण्यापूर्वी स्वतःतील अवगुण शोधण्याची आणि ते मान्य करण्याची तयारी लागते, असे सांगणारे संतश्रेष्ठ कोण होते?

'तू इच्छा धरशील त्‍या स्त्रीशी लग्न होईल'

श्री संत सेवालाल महाराज यांच्या लग्नाबद्दलची कथा जरा वेगळी आहे. आई जगदंबाने सेवालालना सांगितले,‘तू इच्छा धरशील त्‍या स्त्रीशी लग्न होईल.’ सेवालाल महाराज म्हणाले, ‘‘आई, सर्वजण भाऊ संबोधतात. मी भाऊच, तर जगातल्या साऱ्या स्त्रिया माझ्या बहिणी झाल्‍या. मी कुणाशी लग्न करू. उत्तराने आई जगदंबा भारावली. आई जगदंबा सेवालाल महाराजांना विनवणी करतच राहिली. जगात ज्या ठिकाणी बंजारा समाज आढळतो, त्या ठिकाणी सेवालाल महाराजांचे मंदिर बांधले जाते. महाराज बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात. बंजारा समाज विखुरलेला असून तो या उत्‍सवाच्‍या निमित्ताने आपली प्राचीन संस्‍कृती जपण्‍याचा नव्‍या पिढीत रुजविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.