प्रीमियम व्यासपीठ
नवरात्रीच्या नऊ दिवसांत करा आर्थिक नियोजन....
कोणत्याही बाबतीत नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे, पण बहुतेक लोकांची गाडी ही सुरू कुठून आणि कधीपासून करू, म्हणून अडून बसते. सुरवात तर व्हायलाच पाहिजे, हे नक्की. मग यासाठी नवरात्रासारखा दुसरा कुठला चांगला मुहूर्त असू शकतो? या नऊ दिवसांमध्ये आपण आर्थिक नियोजन हे कसे करता येईल ते पाहूया.
लक्ष्मीकांत श्रोत्री
lshrotri@hotmail.com
(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.)
या वर्षी सप्टेंबर महिना हा सणासुदीचा महिना आहे. आपण सण आणि चांगले मुहूर्त हे एखादे नवे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची तयारी किंवा एखादा चांगला निश्चय करण्यासाठी नक्कीच वापरू शकतो. नवरात्रामध्ये आई दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन नऊ दिवस केले जाते आणि हे नऊ दिवस आपण देवीचे स्मरण करून आर्थिक नियोजन केले तर अधिक योग्य ठरेल...