मराठी पोरं कबड्डीचं मैदान गाजवतात. हे काही नवं सांगण्याची गरज नाही. अगदी सामान्य कुटुंबातून आलेली ही मुलं आज प्रो कबड्डीत नाव कमावत आहेत, हे खरं मोठं यश आहे. प्रो कबड्डीमुळे महाराष्ट्राच्या मातीतल्या या खेळाला एक उंची गाठून दिली आणि या व्यासपीठावर मराठी तरुण खेळाडू आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करताना दिसत आहेत.नोकरीच्या शोधात ३०-३५ वर्षांपूर्वी वेल्हे तालुक्यातून पुण्यात स्थायिक झालेल्या आधवडे कुटुंबातील तुषार हा गतविजेत्या 'पुणेरी पलटन'कडून यंदा खेळणार आहे. तुषारचा इथपर्यंतचा प्रवास हा काही सोपा नव्हता.