R Ashwin Cricketing Story : मध्यमगती गोलंदाज कसा बनला जगातील दिग्गज ऑफ स्पिनर? आर अश्विनच्या प्रवासाची गोष्ट

Ravichandran Ashwin Journey : भारतीय संघाने बांगलादेशला पहिल्या कसोटीत पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. चेन्नईच्या लोकल बॉय आर अश्विन याने हा सामना गाजवला.
Ravichandran Ashwin Journey
Ravichandran Ashwin Journey esaka
Updated on

Ravichandran Ashwin story : कधी कधी आयुष्यात जे होतं हे चांगल्यासाठीच होतं, असं समजून पुढे चालत राहायचं असतं. कोण जाणं त्यावेळी ते घडलं म्हणून आज आयुष्यात आनंदी क्षण वेचायला मिळत असावेत. भारताच्या महान फिरकीपटूंपैकी एक आर अश्विन हा ११वी इयत्तेत असताना त्याच्या मनाविरुद्ध एक गोष्ट घडली, परंतु आज मागे वळून पाहताना, ती घडली नसती तर आज तो यशाचा शिखरावर कदाचित दिसला नसता. कसोटीत ५२२ विकेट्स घेऊन त्याने महान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांना कसोटीत सर्वाधिक विक्रम घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मागे टाकले आहे. वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे १५६ व ७२ विकेट्स आहेत...

२०१७ सालची गोष्ट आहे. आर अश्विनचं क्रिकेट संपल्यात जमा होते. २०१७ मध्ये त्याला वन डे व ट्वेंटी-२० संघातून दूर केले गेले होते आणि त्याचे पुनरागमन हे अशक्यच वाटत होते. पण, त्याने कसोटी क्रिकेटमधील पकड सैल होऊ दिली नाही. कसोटीत ऑल राऊंडरची महत्त्वाची भूमिका ओळखून अश्विनने फलंदाजीतही आपला दम दाखवला आणि आजच्या घडीला महेंद्रसिंग धोनीच्या कसोटी शतकांइतकीच शतकं Ash Anna च्या नावावर आहेत. कसोटीत त्याने ६ शतकं व १४ अर्धशतकांसह ३४२२ धावा केल्या आहेत

Ravichandran Ashwin Journey
India Football: वर्ल्ड कपमध्ये फुटबॉलच्या मैदानात भारताचा ‘गोल’ का नाही?

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आर अश्विन म्हणाला, ''कसोटी क्रिकेटचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे, हे मलाही सांगता येणार नाही. हरभजन सिंगची जागा मला भरून काढायची होतीत. मी ज्युनियर क्रिकेट खेळायचो तेव्हा भज्जीच्या गोलंदाजीची कॉपी करायचो. तो माझ्यासाठी प्रेरणास्थान होता. या प्रवासात कुटुंबियांची भूमिका महत्त्वाची आहे. माझ्या टीमने मला नेहमी सपोर्ट केला.''

स्टेडियममध्ये बसून सचिनची फलंदाजी पाहिली अन्...

आयपीएल खेळणारा मुलगा कसोटी क्रिकेटमध्ये किती यश मिळवेल, याबाबत सर्वांनाच शंका होती. पण, या प्रवासात अनेकांनी अश्विनला मदत केली. चेन्नईच्या Mac B Stand मधून सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना पाहणारा मुलगा आज त्याच मैदानावरील दिग्गज बनला आहे. इथेच त्याला पहिलं आयपीएल काँट्रॅक्ट मिळालं. शतक झळकवायचे आहे, असा विचार करून कधीच उतरला नाही, परंतु त्याच्या नावावर ६ कसोटी शतकं आहेत. पण, त्याने डावात पाचपेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा नेहमी विचार केला आणि आज कसोटीत डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या विक्रमात ग्रेट शेन वॉर्न ( ३७) याच्या बाजूला जाऊन बसला आहे. भारताकडून असा पराक्रम करणारा तो अव्वल गोलंदाज आहे.

अश्विनच्या या प्रवासात त्याचे वडील आणि पत्नी प्रिथी यांचा खूप मोठा वाटा आहे. मागील ५ वर्षांत जेव्हा अश्विनचे भारतीय संघातील स्थान धोक्यात आले होते, तेव्हा अश्विनची पत्नी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. १३ नोव्हेंबर २०११ मध्ये अश्विनने त्याची शाळेतली मैत्रीण प्रिथी हिच्यासोबत लग्न केलं. या दोघांना अखिरा व आध्या या दोन मुली आहेत आणि अश्विनला मैदानावर चिअर करण्यासाठी या तिघी उपस्थित असतात. अश्विन व प्रिथी एकाच शाळेत शिकले आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

ashwin prithi
ashwin prithiesakal

१७ सप्टेंबर १९८६ मध्ये तामीळनाडूतील एका सामान्य कुटुंबातील अश्विनचा जन्म.... अश्विनने चेन्नईच्या रस्त्यांवर टेनिस-बॉल क्रिकेटमधून बरंच काही शिकले होते. टेनिस बॉल क्रिकेट मधून शिकलेल्या युक्त्या आणि कौशल्ये, विशेषत: सोडुकू बॉल बोटाने फ्लिक केलेला लेगब्रेक यांचा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वापर करून घेतला. त्याचे वडील स्थानिक क्लबमध्ये जलदगती गोलंदाज म्हणून खेळायचे आणि आपणही जलदगती गोलंदाज व्हायचे हे अश्विनने ठरवले होते. त्याने सुरुवातीचे शालेय शिक्षण पद्म शेशाद्री बाल भवनातून पूर्ण केले आणि नंतर तो पुढील शिक्षणासाठी St. Bede's School मध्ये गेला. त्याने BTech in Information Technology चे शिक्षण पूर्ण केले. पण, त्याचं पहिलं प्रेम हे क्रिकेटचं राहिलं...

चेपॉक स्टेडियम पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या St. Bede’s शाळेच्या मैदानावर आर अश्विनची भेट सी के विजय कुमार यांच्याशी झाली. त्यांनी त्यावेळी तरुण अश्विनला प्रशिक्षण दिले. तो सुरुवातीला मध्यमगती गोलंदाजी करायचा आणि एकदा नेटमध्ये सराव करणाऱ्या अश्विनला कुमार यांनी ऑफ स्पिन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. पण, अश्विनला हे काही पटले नव्हते आणि तो प्रशिक्षकांच्या या निर्णयावर नाराज होता. दुसऱ्या दिवशी नेट्समध्ये त्याला मध्यमगती गोलंदाजी करायची होती, परंतु कुमार यांनी त्याला त्याची परवानगी दिली नाही. त्यांनी त्याला ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यांनी यासंदर्भात त्याच्या वडिलांशी चर्चा केली आणि फिरकी गोलंदाजीतच त्याचं भविष्य आहे, हे समजावून सांगितले.

कुमार यांच्या देखरेखीखाली अश्विनच्या फिरकी गोलंदाजाच्या प्रवासाला सुरुवात झाली. ते त्याच्याकडून तासंनतास सराव करून घेऊ लागले. त्याच्या उंचीमुळे फिरकी गोलंदाजीत त्याला अतिरिक्त उसळी मिळत होती. तेव्हा तामीळनाडूच्या १६ वर्षांखालील संघात चांगले ऑफ स्पिनरही नव्हते आणि अश्विनने संधीचं सोनं केलं. या प्रवासात त्याने बरेच चढ उतार पाहिले, परंतु यशाचा मार्ग गाठण्यासाठी त्याने कोणतीच कसर सोडली नाही. प्रचंड मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर आज त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वकाही मिळवले आहे.  

R Ashwin 500 wkts
R Ashwin 500 wktsesakal

अश्विन हा क्रिकेटमधील बारकावे टिपणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे आणि सतत नवीन शिकायची व प्रयोगशील वृत्तीने त्याला यश मिळवून दिले आहे. अनिल कुंबळे निवृत्त झाल्यानंतर आणि हरभजन सिंगची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर असताना भारताला अश्विनसारख्या फिरकीपटूची नितांत गरज होती. अश्विनने आपल्या पहिल्या कसोटीत नऊ विकेट घेतल्या, ज्यात तो सामनावीर ठरलेला. त्याच्या पहिल्या १६ कसोटींमध्ये त्याने नऊ पाच विकेट्स स्पेल टाकल्या.  

ऑफस्पिनर बनण्यापूर्वी तो स्थानिक क्रिकेटमध्ये सलामीला खेळायचा. अचूक फटकेबाजी आणि संघ अडचणीत असताना फलंदाजीतूनही संयम दाखवणाऱ्या अश्विच्या नावावर सहा कसोटी शतकं आहेत. त्याच्याकडे प्रत्येक फलंदाजासाठी एक वेगळी रणनीती आखलेली असते. २०११ मध्ये तो बॅच पॅचमध्ये होता आणि त्याने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. थांबेल तो अश्विन कसला.... त्याने काऊंटी क्रिकेट गाजवून पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले आणि आज नावावर अनेक विक्रम नोदंवले आहेत...

अश्विनचे रेकॉर्ड्स...

  • कसोटीत एकाच मैदानावर ३ पेक्षा जास्त ५०+ धावा आणि ३०+ विकेट्स अशी कामगिरी असणारा अश्विन हा भारताचा दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे.

  • कपिल देव यांनी चेन्नईत ४ अर्धशतकं, २ शतकं आणि ४० विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने चेन्नईतच २ अर्धशतकं, १ शतक आणि ३० विकेट्स घेतल्या आहेत.

  • आर अश्विन हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २० हून अधिक वेळा ५०+ धावा आणि ३० हून अधिकवेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय

  • ९९ - आर अश्विन

  • ९४ - अनिल कुंबळे

  • ६० - बिशन सिंग बेदी

  • ५४- इशांत शर्मा व रवींद्र जडेजा

एकाच मैदानाववर एकाच कसोटीत शतक आणि पाच विकेट्स एकापेक्षा अधिकवेळा घेणारा अश्विन हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने चेन्नईत २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता आणि आज त्याने बांगलादेश कसोटीत अष्टपैलू कामगिरी केली.  

एकाच कसोटीत शतक अन् पाच विकेट्स घेणारा आर अश्विन या सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याचे वय ३८ वर्ष व दोन दिवस आहे आणि त्याने विनू मंकड ( ३७ वर्ष व २०६ दिवस) यांनी १९५५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पेशावर येथे नोंदवलेला विक्रम मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.