ज्या देशांत जीवनशैलीकडे विचारपूर्वक, शास्त्रीयदृष्ट्या पाहिले जाते त्या देशांत मधुमेहाचे प्रमाण कमी आहे. उदाहरणार्थ, जपान, सिंगापूर, उत्तर युरोपीय देश. तिथे शाळांमधून स्वास्थ्यपूरक आहार दिला जातो, आणि योग्य आहाराबाबत शिक्षणही दिले जाते. व्यायामासाठी वेळ आणि जागा दोन्ही उपलब्ध करून दिले जाते. सार्वजनिक वाहतुकीवर भर दिला जातो. (अँमस्टरडॅम सायकलींचे शहर आहे आणि सिंगापूरमध्ये खासगी मोटारीवर इतर देशांच्या तुलनेत डोईजड कर लावला जातो.) या देशांतील नागरिकांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून निरामय आरोग्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करायला हरकत नसावी.