‘हवा हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा आधार आहे,’ या विधानाच्या सुरुवातीला आता ‘स्वच्छ’ हा शब्द प्राधान्याने जोडण्याबाबत आपल्याला सगळ्यांनाच विचार करावा लागणार आहे.
तंत्रज्ञानाच्या नवनव्या लाटांवर स्वार होत एकविसाव्या शतकाला कवेत घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकालाच या प्रदूषणाचं आणि त्याबरोबर येणाऱ्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्याशी जोडलेल्या आव्हानांना नव्यानं सामोरं जाण्याचं आव्हान स्वीकारावं लागेल.